27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home लातूर ‘डॅशबोर्डा’ने मिळणार कोरोनाची अद्ययावत माहिती

‘डॅशबोर्डा’ने मिळणार कोरोनाची अद्ययावत माहिती

एकमत ऑनलाईन

लातूर : सर्वत्र कोरोनामय वातावरण झालेले असताना दुर्देवाने एखाद्या व्यक्तीला बाधा झाली तर कुठल्या रुग्णालयात जावे? कुठे बेड शिल्लक आहेत? यासह उपचार आणि रुग्ण संख्येबाबत अद्ययावत माहिती देणारा डॅशबोर्ड महापालिकेने विकसित केला असून शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी तो कार्यान्वित करण्यात आला. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील रुग्ण आणि नातेवाईकांची होणारी गैरसोय थांबण्यास मदत होणार. या अद्ययावत डॅशबोर्डच्या माध्यमातून कोरोनाची अद्ययावत माहिती bedinfo.mclatur.org  या संकेत स्थळावर एकाच क्लिकमध्ये मिळू शकणार आहे.

लातूर शहरात एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या किती आहे? आज अ‍ॅक्टिव्ह असणारे रुग्ण किती? किती जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, याची माहिती या डॅशबोर्डद्वारे मिळू शकणार आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उपचार कुठे घ्यावे हे त्याला स्वातंत्र्य असते. अशावेळी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन विचारपूस करण्यास वेळ नसतो. या डॅशबोर्डच्या माध्यमातून ही माहिती देखील दिली जात आहे.

शासकीय रुग्णालयात उत्तम पद्धतीने उपचार केले जात आहेत. शहरात खासगी रुग्णालयातही उपचार सुरु आहेत. या सर्व ठिकाणी एकूण किती बेड्स उपलब्ध आहेत? त्या रुग्णालयात किती रुग्ण उपचार घेत आहेत ? किती बेड शिल्लक आहेत ? याची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. रुग्णालयाचा पत्ता, मोबाईल क्रमांक, बेडची संख्या तसेच नेमलेले नोडल ऑफिसर आणि त्यांचा संपर्क क्रमांकही बोर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. दररोज नव्याने आढळणारे रुग्ण व डिस्चार्ज होणा-या रुग्णांची संख्या अद्ययावत केली जाणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

कोरोना वाढत असताना अफवादेखील पसरत आहेत. रुग्ण व मृत्यूची खोटी संख्या याच्यासोबतच सर्वत्र बेड शिल्लक नसल्याच्याही अफवा पसरविल्या जात आहेत. या डॅशबोर्डमुळे अशा प्रकाराला आळा बसणार आहे. शुक्रवारी महापालिकेत या डॅशबोर्डचे अनावरण करण्यात आले. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, नगरसेवक सुनील मलवाड यांच्यासह अधिका-यांची यावेळी उपस्थिती होती. लातूर शहराला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्या अनुषंगाने विविध उपाय योजना केल्या जात असून शहरातील नागरिकांनी स्वत:ची सुरक्षितता बाळगावी. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतूनच डॅशबोर्ड विकसीत
लातूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शहरातील नागरिकांना वेळोवेळी माहिती देता यावी, रुग्णांनाही परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्याची संकल्पना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मांडली होती. लातूर शहर महानगरपालिकेने ही संकल्पना तातडीने अमलात आणण्यासाठी प्रयत्न केले. लातूरचे रहिवासी शिवकुमार महाजन यांनी हा डॅशबोर्ड विकसित केला आहे.

Read More  कोरोनाबाधित शव घेण्यास नातेवाईकांचा नकार

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात मृतांचा आकडा ४०० पार

आणखी १० बाधितांचा मृत्यू, ३०३ नव्या रुग्णांची भर लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी आणखी ३०३ नव्या रुग्णांची भर पडली आहे....

पूर्ण क्षमतेने धावू लागल्या बसेस

लातूर (प्रतिनिधी): कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव देशात व महाराष्ट्रात वाढू नये म्हणून शासनाने मार्च महिण्याच्या आखेर पासून आंतर जिल्हा एसटी बसेसची प्रवाशी सेवा थांबवली होती....

प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांचे निधन

लातूर : परिवर्तनवादी चळवळीतील अग्रणी व्यक्तीमत्व प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे यांचे दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले. ते ७२ वर्षांचे...

नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाकडून आदेश

निलंगा (लक्ष्मण पाटील ): तालुक्यातील औराद शहाजानी येथे गुरुवारी ढगफुटीने झालेल्या शेतातील पिकाची , घरांची , तुंबलेल्या नाल्याची व दुकानाच्या नुकसानीची दि १८ सप्टेंबर...

आमदार पवार यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन

औसा : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने न्यायालयाच्या...

पोहरेगाव येथे ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा

पोहरेगाव (शरद राठोड) : रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे पुन्हा हळूहळू कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढू लागले. पोहरेगाव येथे ६ रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता. त्याच्यामधून...

समाजसेवेचा लातूर पॅटर्न निर्माण करावा

लातूर : काँग्रेस पक्षाला त्यागाची, सेवेची मोठी परंपरा आहे ही परंपरा कायम राखत. लातूर शहर जिल्हा व जिल्हा काँग्रेसने कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक बूथ,...

कांदा निर्यातबंदीचा फेरविचार व्हावा- पाशा पटेल

लातूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी...

निखिल पिंगळे, लातूरचे नवीन पोलिस अधीक्षक

मुंबई :  गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. 22 पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे...

महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाच्या भावनेशी एकरुप

लातूर (प्रतिनिधी ): महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मराठा समाजाच्या भावनेशी एकरुप असुन मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...