21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeलातूरसात दिवसानंतर निघणार सौदा

सात दिवसानंतर निघणार सौदा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर आडत बाजार गेल्या सात दिवसापासून हमालांच्या हमाली दर वाढीवरून बंद आहे. रविवारी झालेल्या बैठकीत आडत बाजार सुरू ठेवून वाटाघाटी करून हमालीच्या दराविषयी मार्ग करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी लातूरचा आडत बाजार सुरू होणार असून शेतमालाचा सौदा निघणार आहे.

लातूरच्या आडत बाजार पेठेत रविवारी हमाल मापाडी गाडीवान घटनेची बैठक पार पडली. या बैठकीस लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललीतकुमार शहा, उपसभापती मनोज पाटील, सचिव सतीश भोसले, सहसचिव भास्कर शिंदे, संचालक हर्षवर्धन सवई, संघटनेचे अध्यक्ष रज्जाक शेख, ज्ञानोबा कांबळे, सचिव गोविंद लहूबंदे, उत्तम सोनवणे, जननायक संघटनेचे लखन साबळे आदी उपस्थित होते.

लातूरच्या आडत बाजार पेठेत सोयाबनची सध्या मोठया प्रमाणात आवक होत आहे. खरीप हंगामात आगोदरच शेतक-यांना अतिवृष्टीच्या पावसाने झटका दिला आहे. तर कोरोनामुळेही शेतक-यांना आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आडत बाजार सुरूळीत सुरू झाला असता हामालांकडून होत असलेल्या हामाली वाढीच्या मागणीस खरेदीदाराकडुन प्रतिसाद न मिळाल्यामुळे हामालांनी बाजार बंदचे हात्यार उपसले आहे. खरेदीदार, व्यापारी, हामालांच्या वांद्यायात शेतकरी भरडला जात आहे. दिवाळी पाडव्याच्या सणादिवशी आडत बाजारात ६५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तसेच भावही प्रतिक्विंटल ४ हजार १०० च्या पुढे गेला होता. त्या दिवसानंतर आडत बाजार बंद असल्यामुळे शेतक-यांची आडचण झाली आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी झालेल्या बैठकीत आडत बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आडत बाजारातील व्यवहार करतच हमालीच्या संदर्भाने बैठका घेवून सदर विषय मार्गी लावण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात या विषयाच्या संदर्भाने तोडगा निघेल असा बैठकीतील सुर होता.

एक-दोन बैठकीत विषय मार्गी लागेल
शेतक-यांचे नुकसान होत आहे. ते होऊ नये म्हणून लातूरचा आडत बाजार सोमवार पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदीदार व्यापारी व हमाल यांच्या बैठका घेवून त्यांना समजावले आहे. एक-दोन बैठकीत हमालांच्या हमालीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी प्रतिक्रीया लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललीतकुमार शहा यांनी दिली.

७० टक्के हमाली दरवाढीची मागणी
खरेदीदार व हमालांच्या मध्ये २०१७ साली करार झाला होता. त्यावेळी ३० टक्के हमालीची वाढ करण्यात आली होती. या कराराचा कालावधी मार्च २०२० रोजी संपला आहे. त्यासाठी नव्याने ७० टक्के हमाली दरवाढीची संघटनेने मागणी केली आहे. या संदर्भाने दि. २६ नोव्हेंबरच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निलंग्यातील पोलिस कर्मचारी राजकुमार लोखंडे यांचे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या