25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeलातूरपानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

एकमत ऑनलाईन

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी आजच द्या अन्यथा आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये प्रवेश करू देणार नाही व तुमच्या तोंडाला काळे फासल्याशिवायही राहणार नाही, अशी भूमिका घेतल्याने ग्रामविकास अधिका-यांनी ग्रामनिधीतील दिढ लाख रुपये धनादेश दिव्यांगांना दिले.

पानगाव येथील दिव्यांगांना गेल्या चार वर्षांपासून पानगाव ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून तसेच चौदाव्या वित्तआयोगातून एकही रुपयाचा निधी दिला नाही .यासाठी मनसेच्या वतीने दिव्यांगांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले होते तसेच पानगाव येथील दिव्यांगांनी आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा निवेदन दिले होते मात्र गेल्या चार वर्षांपासून पानगाव ग्रामपंचायत कडून आम्ही तुम्हाला लवकर निधी देऊ या आश्वानशिवाय काहीही मिळाले नाही . चौदाव्या वित्त आयोगातून दिव्यांगांच्या बचत गटांना उपजीविकेसाठी व्यवसाय करण्याकरिता निधी देण्याची तरतूद आहे. यासाठी पानगाव येथील दिव्यांगांनी बचतगटही तयार केलेला आहे परंतु चौदाव्या वित्त आयोगातूनही पानगाव ग्रामपंचायतीने दिव्यांगांच्या बचत गटांना आद्यापपर्यंत निधी दिलेला नाही.

ग्रामपंचायतिकडे दर वर्षी जमा होणा-या ग्रामनिधीतील ५ टक्के रक्कम दिव्यांगांवर खर्च करण्याची तरतूद असतानाही पानगाव ग्रामपंचायतीने मात्र गेल्या चार वर्षांपासून दररोज दिव्यांग निधीसाठी ग्रामपंचायतकडे चकरा मारत असतानाही एकही रुपयाचा खर्च केला नाही. कोरोनाच्या काळात हाताला काम नसल्याने पानगाव येथील दिव्यांग दररोज सरपंच व ग्रामसेवकाला गेल्या चार वर्षांपासून हक्काचा निधी दिला नाही .कोरोनामुळे आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. किमान आतातरी हक्काचा निधी द्या अशी अनेक वेळा विनंती केली होती. या प्रकरणी आठ दिवसात निधी नाही मिळाला तर ग्रामविस्तार अधिका-यांंच्या तोंडाला काळे फासू असा इशारा मनसेचे ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व चेतन चव्हाण यांच्या वतीने देण्यात आला होता यावर ग्रामविकास अधिका-यांनी तुम्ही मला पंधरा दिवसाचा वेळ दया जर मी पंधरा दिवसात पैसे नाही दिले तर तुम्ही काय करायचे ते करा असे मनसे कार्यकर्त्याना सांगितले होते.

त्यानंतर जवळपास वीस दिवसांनी ग्रामविकास अधिकारी मासिक बैठकीसाठी पानगावला आले असता मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ग्रामपंचायतच्या बाहेरच ग्रामविकास अधिका-यांना अडवून घेराव घातला व आज जर तुम्ही दिव्यांगांचे पैसे नाही दिले तर आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतिमध्येही जाऊ देणार नाही व तुमच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देताच ग्रामविकास त्यांनी दिढ लाख रुपयांचा चेक पानगाव येथील दिव्यांगांना सुपूद केला. यावर आनंदी होऊन पानगाव येथील सर्व दिव्यांगांनी इम्रान मणियार व चेतन चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी शीतल वैष्णव, शेषेराव कुलकर्णी, शकुंतला हरिदास, सोफिया पठाण, रफिक पठाण, नूरखान पठाण यांच्यासह पानगाव येथील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते .यावेळी ग्रामवस्तिार अधिकारी टकले यांनी दिव्यांगांची बाकी राहिलेली रक्कमही लवकरच देऊ असे आश्वासन दिले.

सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या