24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरजिल्हा बँकेने सामान्य शेतक-यांना आर्थिक मदत केली

जिल्हा बँकेने सामान्य शेतक-यांना आर्थिक मदत केली

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सामान्य शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम मागच्या ३० वर्षापासून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरु आहे. त्यामुळेच आज जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसत आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतक-यांना वेगवेगळया योजनेतून मदत करण्याची भूमिका घेतली असून सर्वांना सोबत घेऊन शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँक प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव यांनी केले.

लातूर येथील जिल्हा बँकेच्या मुख्यालयात लातूर तालुक्यातील २०२०-२१ बँक स्तरावर १०० टक्के वसुली झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन यांचा सत्कार मंगळवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अँड. राजकुमार पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, अशोकराव गोविंदपुरकर, दिलिप पाटील नागराळकर, सौ सपना किसवे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुधाकर रुकमे, इंदिरा सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम पाटील, विलास साखर कारखान्याचे संचालक गोविंद डुरे पाटील, अँड. युवराज जाधव, जगदीश बावणे, हरीराम कुलकर्णी, अनंत बारबोले, सतीश पाटील उपस्थित होते. यावेळी अँड.राजकुमार पाटील यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळया योजनेतून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विविध योजनेतून मदत करण्याची भूमिका घेत आहे.

याप्रसंगी लातूर तालुक्यातील ८१ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पैकी ७० संस्था १०० टक्के वसुली पात्र ठरलेल्या असून सर्व चेअरमन मंडळींचा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अशोक गोविंदपुरकर, दिलीप पाटील नागराळकर, राजकुमार पाटील, संचालिका सौ सपना किसवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे लातूर तालुका फील्ड ऑफिसर राजेश मोरे, गटसचीव संघटनेचे जिवन सुर्यवंशी, विजयकुमार माने, शांत्तापा टेंकाळे, राजेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन मगर यांनी केले. तर आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ यांनी मांडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या