लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत लोकांनी मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिले आहे. आपल्यावर विश्वास ठेवला आह.े वेळोवेळी शेतक-यांना मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांच्या पाठीशी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आशियाना निवासस्थानी देवणी तालुक्यातील जवळगा, लातूर तालुक्यातील गुंफावाडी येथील नूतन विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केला त्यावेळीं ते बोलत होते
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे, काँग्रेसचे मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष हरीराम कुलकर्णी, विजय पाटील, संजय रेड्डी, अनिल पाटील, जवळगा विविध कार्यकारी सोसायटीचे नूतन चेअरमन शेषराव पाटील, सोसायटीचे उपाध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी, संचालक प्रा. रामलिंग मुळे, देविदास जाधव, बालाजी गंभीरे, संजय येडले, शिवाजी सोनकांबळे, व्यंकट बोडके, लताताई बिरादार, दैवशाला पाटील, संजय बिरादार, दामोधर जाधव, श्रीधर धानुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.