26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeलातूरजिल्ह्यात जूनमध्ये आतापर्यंत ६५.४ मिलीमीटर पाऊस

जिल्ह्यात जूनमध्ये आतापर्यंत ६५.४ मिलीमीटर पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात जुनमध्ये आतापर्यंत ६५.४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. उदगीर तालुक्यात सर्वाधिक १११.८ मिलीमीटर तर लातूर तालुक्यात सर्वात कमी ३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात मे महिल्याच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत बेमोसमी पावसाचा वादळी जोर होतो. जिल्ह्यात कधी कुठे तर कधी कुठे बेमोसमी पाऊस वीजांच्या कडकडाटांसह पडला. या पावसात विजा पडुन अनेक पशुधनाला जीव गमवावा लागला. आंबा, द्राक्ष आदी फळबांगांचे नुकसान झाले. यंदा पाऊस चांगला असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे शेतक-यांनी मे महिन्याच्या उन्हाचा तडाखा सहन करीत खरीपासाठी रान तयार केली. पेरणीपुर्व मशागती वेळेत उरकुन घेतल्या. बी, बियाणे, खते यांची जमवाजमव केली. पेरणी योग्य पाऊस पडताच पेरण्या उरकण्याची सर्व तयारी शेतक-यांनी करुन ठेवलेली आहेत. मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने पेरण्या रखडल्या आहेत.

लातूर जिल्हा पर्जन्य छायेखाली प्रदेश म्हणून ओळखला जातो. असमतोल पाऊस हे लातूर जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य मानले जाते. परंतु गत वर्षी संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील दोन मोठे, आठ मध्ये व १३२ असे एकुण १४२ प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले होते. लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणही पुर्ण क्षमतेने भरले होते. या धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते. आजही बहूतेक प्रकल्पांत ब-यापैकी पाणीपातळी असल्यामुळे यंदाचा उन्हाळा टँकरमुक्त होता. आता मान्सुनचा पाऊस सुरु झाला आहे. जिल्ह्यात जुनमध्ये आतापर्यंत ६५.४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या