23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाने जिल्हा घडवला

जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाने जिल्हा घडवला

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या ४५ वर्षात जो सर्व क्षेत्रात विकास झाला त्यात विकासरत्न विलासराव देशमुख, काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील चौफेर विकास झाला सिंचन, साखर उद्योग, दळणवळण यंत्रणा, व्यापार उभारला गेला त्यामूळे जिल्ह्यातील लोकांना सुख, समृध्दी मिळत आहे. याचे श्रेय काँग्रेसच्या नेते मंडळींना आहे, असे प्रतिपादन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे गुरुवारी पदयात्रा आयोजीत करण्यात आली होती त्यावेळी ते संवाद सभेत बोलताना केले.

नेतृत्वाने दुष्काळी भागातील सिंचन व्यवस्था वाढवली
एकेकाळी लातूर जिंल्हा हा दुष्काळी भागातील जिल्हा अशी ओळख होती ती ओळख पुसून काढण्याचे कार्य विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हाभरात सिंचन क्षेत्र वाढवले साठवण तलाव बांधली साखर उद्योग सुरु केल. उस गाळप मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्याने शेतक-यांचे जीवन मान उंचावण्यासाठी मांजरा साखर परिवाराने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतक-यांना प्रगतीकडे घेवून नेण्याचे काम नेते मंडळी ने केले आहे. त्यामूळे जिल्ह्यातील आज सगळीकडे चोहीकडे सुजलाम्-सुफलाम् झाल्याचे चित्र बघायला मिळाले आहे, ते केवळ काँग्रेसच्या नेते मंडळींमुळे हे आपल्याला विसरता येणार नाही, असे सांगून भविष्यात आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष योग्य उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा फ्रंट काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, रमेश सूर्यवंशी, शरद देशमुख, प्रा. एकनाथ पाटील, हरिराम कुलकर्णी, प्रवीण सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, विपुल हाके, जिल्हा समन्वयक सचिन दाताळ, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, अ‍ॅड. अजित माने, शिरुर अनंतपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, नगरसेवक सुधीर लखनगावे, लाला पटेल, मधुकर जाधव, सुरेंद्र धुमाळ, पंकज शेळके, हमीद शेख, अ‍ॅड. सुतेज माने, संजय बिराजदार आदि मान्यवर उपस्थित होत. पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे स्वागत निलंगा तालुक्यातील दौ-यावर निघालेल्या पदयात्रेत वाटेत निटूर, मसलगा, कलांडी ग्रामस्थांनी स्वागत केले तर शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन होताच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या