23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरशेतक-यांनी धरली चाढयावर मूठ

शेतक-यांनी धरली चाढयावर मूठ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात समविषम स्वरूपात पाऊस पडत असल्याने केवळ तीन तालुक्यात झालेल्या माध्यम स्वरूपाच्या पावसामुळे त्या परिसरातील शेतक-यांनी खरीपाच्या पेरणीसाठी चाढयावर मुठ धरली आहे. जिल्हयात यावर्षी ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा अपेक्षित असून आज घडीला ५८ हजार ४४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाच तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत अत्यल्प असल्याने त्या परिसरातील शेतक-यांना मोठया पावसाची प्रतिक्षा आहे.

खरीपाच्या पेरणीपुर्व शेतातील मशागतीची कामे शेतक-यांनी पूर्ण केली असून आता पेरणीसाठी पावसाकडे डोळे लागले आहेत. यावर्षी ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होणार आहे. यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तुर, १० हजार हेक्टर क्षेत्रावर मुग, ८ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद, १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, ४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका, १ हजार हेक्टर क्षेत्रावर भुईमुंग, ८०० हेक्टर क्षेत्रावर तीळ, तसेच उर्वरीत क्षेत्रावर बाजरी, साळ, सुर्यफूल, व तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्यांचा पेरा होणार आहे.

लातूर जिल्हयात आजपर्यंत ८७.६ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी चाढयावर मूठ धरली आहे. यात अहमदपूर तालुक्यात २० हजार ५७० हेक्टरवर तूर, सोयाबीन व इतर पिके, शिरूर अनंतपाळ तालुक्यात २१ हजार ३७० हेक्टरवर तूर, सोयाबीन व इतर पिके, उदगीर तालुक्यात ७ हजार ५०० हेक्टरवर तूर, सोयाबीन व इतर पिके, चाकूर तालुक्यात १ हजार ७२ हेक्टरवर तूर, सोयाबीन व इतर पिके, तर जळकोट तालुक्यात ७ हजार ९३३ हेक्टरवर तूर, सोयाबीन व इतर पिकांचा पेरा झाला आहे. तर लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, देवणी तालुक्यातील पेरण्या पावसाभावी खोळंबल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या