32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरकृषी विधेयक हाणून पाडण्यासाठी आयोजित शेतकरी बचाव रॕलीस औशात उत्फूर्त प्रतिसाद

कृषी विधेयक हाणून पाडण्यासाठी आयोजित शेतकरी बचाव रॕलीस औशात उत्फूर्त प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

औसा ( प्रतिनिधी ) : लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित शेतकरी बचाव आॕनलाईन रॕलीस औसा तालुक्यात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्वतः जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे हे औसा येथील रॕलीत सहभागी झाले होते .

येथील स्नेहश्री फाऊंडेशनच्या सभागृहात व्हर्चुअल सभेचे प्रसारण करण्यात आले .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यातील विविध सहा ठिकाणाहून या सभेचे आयोजन करण्यात आले . या सभेचे लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आजदि १५ आॕक्टोबर रोजी संपूर्ण लातूर जिल्ह्यात एकूण ३४० ठिकाणी शेतकरी बचाव व्हर्चुअल रॅली संपन्न झाली आहे.

हुकुमशाही भाजप सरकार विरुद्ध काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून शेतकरी विरोधी काळे कायदे महाराष्ट्रात अडवणार आहे. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी , राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून मोठे आंदोल उभे राहत आहे .दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन राष्टपती महोदयाने पाठविण्यात येवून हा शेतकरी विरोधी काळा कायदा , शेतकऱ्यांना गुलाम बनविणारा कायदा ताबडतोब रद्द करावा अशी मागणी या शेतकरी संमेलनात करण्यात आली .

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची विशाल व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅली लातूर जिल्ह्यात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५५ ठिकाणी तर लातूर शहरात ८५ ठिकाणी अशी एकूण ३४० आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी औसा येथील संमेलनात बोलताना दिली आहे.

कोरोनामुक्तांची श्रवणशक्ती कमी होतेय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या