25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरशेतक-यांना नुकसानीची तातडीने मदत द्यावी

शेतक-यांना नुकसानीची तातडीने मदत द्यावी

एकमत ऑनलाईन

औसा: शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्याची तरतूद करण्याची विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात जवळपास ५ लाख ७५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून संततधार पावसामुळे व शंखी गोगलगायींच्या झालेल्या प्रादुर्भावाने पिके नष्ट झाली आहेत. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गतच्या निकषात पिकांवर होणारे किड हल्ले ही बाब समाविष्ट आहे परंतु शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसानीचा समावेश नसल्याने नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देता येत नसल्याचे महसूल विभागाचे मत आहे. सन २०१७ बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकांचे नुकसान झाले होते. तेव्हा शासनाने पिकांच्या बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या निकषात करून शेतक-यांना एनडीआरएफ /एसडिआरफ आर्थिक मदत वितरित केली होती.

लातूर जिल्ह्यात शंखी गोगलगायीचे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून उगवलेली कोवळी पिकेही खावून फस्त करीत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या एनडीआरएफ /एसडिआरफ निकषात बोंडअळीच्या धर्तीवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा समावेश करण्यात यावा तसेच सदरील नुकसानीचे पंचनामे करून अधिकाधिक आर्थिक मदत देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती निवेदनाव्दारे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे कोवळी पिके नष्ट झाली असून संभाव्य उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे. याचा विचार करून प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या तरतुदीनुसार विमाधारक शेतक-यांना २५ टक्के आगाऊ पीकविमा वितरित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधीना यांना देण्यात याव्यात अशीही आग्रही विनंती यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या