23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरविशाल गिरी दिग्दर्शित ‘गल्ला’ चित्रपटाने ंिजंकली लातूरच्या प्रेक्षकांची मने

विशाल गिरी दिग्दर्शित ‘गल्ला’ चित्रपटाने ंिजंकली लातूरच्या प्रेक्षकांची मने

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूरचा सुपुत्र तथा चित्रपट सृष्टीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक विशाल गिरी दिग्दर्शित ‘गल्ला’ या हिंदी चित्रपटाने लातूरच्या सिनेप्रेक्षकांची मने जिंकून घेण्याचे काम केले आहे. विशाल गिरी क्रिएटिव्ह स्कुल ऑफ अ‍ॅंिक्टग प्रस्तुत गल्ला या एक तासाच्या शॉर्ट फिल्म्सचे लेखन व दिग्दर्शन विशाल गिरी यांनी केले आहे. कल्पक दिग्दर्शक गिरी यांनी समाजातील वास्तव अत्यंत उत्कृष्टरित्या या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पडद्यावर मांडले आहे.

या शॉर्ट फिल्मला भारतीय, कॅनडा , स्पॅनिश (स्पेन), फ्रेंच (फ्रांस), जर्मन, स्पॅनिश (मेक्सिको), फ्रेंच (कॅनडा) या सात भाषांमध्ये नामांकनेही मिळाली आहेत. या चित्रपटात खुशी पोतदार, प्रिती दुर्वे, दिनेश भुरके, सनी कुमार, अर्चना सूर्यवंशी, युक्ता पाटील या लातूरच्या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. दिग्दर्शक विशाल गिरी यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून गरीब सामान्य कुटुंबाबाचा जीवन प्रवास उत्कृष्टरित्या पडद्यावर मांडण्याचे काम केले आहे. लातूरच्या पीव्हीआर चित्रपट गृहात या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्यास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या