22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूर२ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

२ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या तृतिय सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. विधानसभेच्या मतदार याद्याच महानरगपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. या मतदार याद्यानूसार घरोघरी जावून मतदारांची माहिती घेतली जाणार आहे. संबंधीत मतदार कोणत्या प्रभागात येतो त्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रारुप मतदार यादी तयार केली जाणार आहे. याकरीता आयुक्त अमन मित्तल यांनी सात पथकांची नियुक्ती केली आहे. निवडणुक कार्यक्रमानूसार दि. २ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

लातूर शहर महानगरपालिकेची स्थापना २५ ऑक्टोबर २०११ रोजी झाली. लातूर शहर महानगरपालिकेच्या द्वितीय सार्वत्रिक निवडणुकीतील विजयी लोकप्रतिनिधींची मुदत दि. २१ मे २०२२ रोजी संपली. याच महिन्यात महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली. आता १ जानेवारी २०२२ हा अर्हता दिनांक धरुन भारत निवडणुक आयोगाकडून ३१ मे २०२२ पर्यंत अद्यावत केलेली विधानसभेची मतदार यादी महानगरपालिकेच्या निवडणुकीकरीता वापरण्यात येणार आहे. या याद्यांचा वापर करुन महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनूसार प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम केले जाणार आ.े या मतदार याद्यांवर आलेल्या हरकती किंवा सूचनेत दुरुस्ती केली जाणार आहे.

लातूर शहर महानगरपालिकेने विधानसभेच्या मतदार याद्यानूसार आता कामाला सुरुवात केली आहे. आयुक्त अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (निवडणुक) वीणा पवार यांच्यावर जबाबदारी असणार आहे. महानगरपालिकेचे २७ प्रभाग आहेत. या करीता सात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नवनाथ केंद्रे, विजयकुमार चव्हाण, उषा काकडे, निकिता भांगे, समद शेख, यु. डी. स्वाती, पी. सी. घंटे हे अधिकारी पथक प्रमुख आहेत. एका एका पथकाकडे चार प्रभाग देण्यात आले आहेत. एका पथकात कामासाठी ३६ कर्मचारीही देण्यात आले आहेत. या पथाकांना मतदार याद्या देण्यात आल्या आहेत. ही पथके घरोघरी जावून मतदार याद्यानूसार मतदारांचा शोध घेणार आहेत. तसेच ते मतदार कोणत्या प्रभागात येतात याचीही नोंद करणार आहेत. त्यानंतरच प्रारुप मतदार यादी तयार केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या