23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरडोंगरशेळकीत पहिले डिजिटल स्वस्त धान्य दुकान

डोंगरशेळकीत पहिले डिजिटल स्वस्त धान्य दुकान

एकमत ऑनलाईन

जळकोट तालुक्यातील सर्व राशन दुकानांमध्ये आयएसओ प्रणाली राबविण्यासाठी जळकोट येथील तहसील कार्यालयामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जळकोट तालुक्यातील राशन दुकानांमध्ये आयएसओ प्रणाली राबवावी, सूचना करण्यात आली होती. सूचनेप्रमाणे जळकोट तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात ही प्रणाली राबवण्यास सुरुवात झाली असून. तालुक्यातील पहिले डिजिटल रेशन दुकान होण्याचा मान डोंगर कोंनाळी या गावात मिळाला आहे.

तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी सर्व संयुक्त डिजिटल रेशन दुकानचे उद्घाटन करण्यात आले. रास्त भाव दुकानांमध्ये योजना न्याय याद्या तयार करणे, रंगकाम करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, तसेच शासकीय गोडाऊनमध्ये फायर फायटर, स्मोक डिटेक्टर, लाईट व पंखे पिण्याचे पाणी प्रथम उपचार पेटी अशा गोष्टी बसवणे, आदी बाबींवर जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी मार्गदर्शन केले होते.
दुकानच्या उद्घाटनप्रसंगी नायब तहसिलदार जी एल खरात, पुरवठा विभागाचे शिवराज एम्पल्ले, मंडळ अधिकारी सुरेवाड, तलाठी अनिल उमाटे, युवराज करेपा, तानाजी भंडारे, तलाठी कवडेकर, कोंडीबा गवळे, नारायण रेणुगुंटवार, सरपंच शिंदे, उपसरपंच महादेव कवठाळे, निवडणूक विभागाचे आर पी शेख, बुके यांच्यासह रास्त भाव दुकानदार तसेच इतर नागरिकांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या