23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरहेल्थ वर्कसना हिपॅटायटीस बी लसीची पहिली मात्रा

हेल्थ वर्कसना हिपॅटायटीस बी लसीची पहिली मात्रा

एकमत ऑनलाईन

लातूर : जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेतील हेल्थ केअर वर्कस यांना हिपॅटायटीस बी लसीची पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील सर्व नाकरिकामध्ये जनजागृती व्हावी याकरिता सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये कार्यक्रम आयोजित करुन रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईक तसेच बा रुग्ण विभागामध्ये आलेले रुग्ण त्यांचे नातेवाईकांना हिपॅटायटीस आजाराविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच हिपॅटायटीस हा आजार होऊ नये याकरिाता घ्यावयाची काळजी तसेच हिपॅटायटीस लस घेतल्यानंतर शरीरावर होणारे फायदे याबाबत देखील सर्वशासकीय आरोग्य संस्थेमध्ये माहिती देण्यात आली.

जिलहास्तरावर स्त्री रुग्णांलय, लातूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांच्या अघ्यक्षेतेखाली रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राहुल वाघमारे यांनी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करुन स्त्री रुग्णांलय, लातूर येथील बा रुग्ण विभागात आलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक यांना हिपॅटायटीस आजाराविषयाी तसेच हिपॅटायटीस बी लसीबाबत माहिती देवून रुग्णांलयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राहुल वाघमारे यांच्यासह रुग्णाालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांना हिपॅटायटीस लसीची मात्रा देण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हा शलयचिकित्स डॉ. देशमुख, स्त्री रूग्णांलयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राहुल वाघमारे, अधीक्षक डॉ. धनंजय पडवळ, डॉ. अशोक धुमाळ तसेच रूग्णांलयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्यांचे १८०० कोटींचे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या