22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरफुलाने फुल पाठवले सुगंधी श्वास झाला...

फुलाने फुल पाठवले सुगंधी श्वास झाला…

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयात होत असलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता उत्सव समारंभात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी केले. कवी योगीराज माने यांच्या फुलाने फुल पाठवले सुगंधी श्वास झाला…, या कवितेला तरुणांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.

कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजय पाटील हे होते. विचार मंचावर मराठी साहित्यातील विख्यातनाम कवी योगीराज माने हे होते. याबरोबरच मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शंकर येडले, प्रा. डॉ. सुरेखा बनकर, प्रा. डॉ. शिराळकर उपस्थित होते. या कवी संमेलनासाठी प्रा. इंगोले, कवियत्री नयनराजे, डॉ, सुरेखा बनकर, शैलजा करंडे, उषा भोसले, वृषाली पाटील या कवींचे काव्य संमेलनात बहारदार काव्य वाचन झाले. महाविद्यालयातील तरुणांचा कविता ऐकण्याचा उत्साहाने प्रतिसाद इतका उत्स्फूर्त व भरभरून होता की हे बहरलेले ंकवी संमेलन प्रत्येक कवितेच्या कवितांनी अधिकच रंगदार असे झाले.
कविता म्हणजे मातीतून उगवणारा हळुवार कोण असते, कविता असते कृष्णाची बासरी, प्रत्येक राधेच्या -हदयाातील या कविता ऐकताना तरुणांचा उत्साह बहरला. कवियत्री नयनराजे माने यांनी सादर केलेली कविता असं अजून कोणी भेटले नाही, जो भेटणार असा काही, तो कसा असावा युवतीने आपला जोडीदार निवडताना तिच्या मनातला प्रेमळ सखा सोबती हा तिच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा असावा. -हदयातील दु:ख कोणी तरी हलके करणारे असावे. या जाणिवेने रसिक तरुण भारवले होते. खरंतर कविता म्हणजे जे गोड स्वप्न असत पहाटे पडलेले.

कविता म्हणजे गोल गुपित असतं. तिच्या मनात दडलेले प्रेम कवितामधील मधुर भाव आत्मसात करताना मुले, मुली फुलासारखी फुलून आली होती. कवियत्री उषा भोसले यांनी उथळ प्रेमातले धोके सांगणारी कविता सादर केली. प्रेमात वहात जायचं नाह, मनाला पक्क सांगून अडकून पडायचं नाही, आई-वडील मुलांना सांभाळताना हाताच्या फोडाप्रमाणे जपतात तेव्हा युवकांनी स्वत:ला जपावं सैराट वागणे हा संदेश या काव्यसंमेलातून देण्यात आला. कवियत्री शैलजा करंडे यांनी या शब्दांची दिशा वेगळी या कवितेतून कवितेचे महत्त्व युवकांना सांगितले. या कवी संमेलनातील योगीराज माने यांनी आपल्या काव्य गायनाने सर्वांनाच मंत्रमुक्त केले. फुलाने फुल पाठवले सुगंधी श्वास झाला, हा सखी भेटून गेल्याचा मनाला भास झाला आहे, तसा गुलाबी किस्सा घडतोही ती आल्यावर आत्ताचा पाऊस पडतो ती आल्यावर, काय नेमके होते घडते, -हदयाचा समतोल बी बोलतो ती आल्यावर.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी युवकांनी प्रेम कॉलेज अभ्यास विद्यार्थी जीवन जगताना आपल्या भावना मनाला प्रसन्न ठेवून निर्माण मनाने जीवनाचा आनंद घेऊन आपले व्यक्तिगत घडवावे, असे सांगितले. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. विशंभर इंगोले आणि योगीराज माने यांनी केले. या समारंभात सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या