लातूर : राज्य निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमांनुसार लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६६ जागा व त्याअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्यांच्या १३२ जागांच्या निवडणुकांकरिता प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करणेबाबतचा कार्यक्रम दिलेला आहे. त्यानुसार दि. २ जून २०२२ रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिध्द केलेली आहे. सदरील अधिसुचना ही महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (१९६२ चा अधिनियम (५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथील फलकावर पाहण्यासाठी उपलब्ध केलेली आहे.
या प्रारुप प्रभाग रचनेवर काही हरकती व सुचना असल्यास त्या दि. २ ते दि. ८ जून या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे ग्रामपंचायत निवडणुक शाखेत सादर करता येतील, तसेच प्रारुप प्रभाग रचनेचे अवलोकन सर्व संबंधितानी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लातूर यांच्या तर्फे करण्यांत येत आहे.