24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरविम्याचा निकष बाजूला ठेवून सरकारने मदत करावी

विम्याचा निकष बाजूला ठेवून सरकारने मदत करावी

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यामध्ये गत सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूआहे. मंगळवारी तर जळकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिक विमा चा निकाल बाजूला ठेवून सरकारने मदत करावी अशी मागणी जळकोट तालुक्यातील शेतक-यांनी केली आहे .

पिक विमा कंपनीने तसेच प्रशासनाचे वतीने शेतक-यांना पीक विमा भरून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, असे असले तरी गत सहा दिवसांपासून जळकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील शेतक-यांंना घराच्या बाहेर निघणे कठीन बनले आहे अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकरी कसे पीक विमा भरतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जळकोट तालुक्यातील परिसरातील शेतक-यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत पेरणी करुन घेतली होती. महागाचे बी-बियाणे आणून पेरणी केली होती. काही शेतक-यांंच्या बियाण्याची उगवणही चांगल्या प्रकारे झाली होती तर काही शेतक-यांंना दुबार पेरणी करावी लागली.

पेरणी झाल्यानंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला यामुळे बियाणे दबले गेले. काही शेतक-यांनी जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात पेरणी केल्या. शेतक-यांंचे बियाणे चांगले उगवले. यापैकी काही शेतक-यांंनी आपल्या शेतामध्ये कोळपणीही केली परंतु तालुक्यामध्ये सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत आहे यामुळे पेरणी केलेले पीक पाण्याखाली गेलेले आहे. यामुळे बहुतांश पिकांना मोठा फटका बसलेला आहे तर ज्या शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली अशा शेतक-यांचे बियाणे दुस-यांदा देखील उगवले नाही .

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतक-यांंना जरी पिक विमा भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी जळकोट तालुक्यात गत सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे शेतक-यांना घराच्या बाहेर देखील पडणे शक्य होत नाही अनेक ठिकाणी नद्यांना पाणी आले आहे . अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. यामुळे अनेक शेतक-याना विमा भरणे शक्य झाले नाही यामुळे महाराष्ट्र शासनाने पीक विम्याची वाट न पाहता सरसकट शेतक-याना मदत करावी अशी मागणी जळकोट तालुक्यातील शेतक-यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या