31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeलातूरसरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे व पवारांना गतवर्षीच्या त्यांच्या मागणीची करुन दिली आठवण

एकमत ऑनलाईन

औसा (संजय सगरे) : अतिवृष्टीचे संकट खुप मोठे आहे .शेतीत जे जे पेरलं होते ते सर्व वाहून गेले आहे .शेती खरडून गेली आहे अद्याप ही ब-याच शेतकऱ्यांचे शेतात पाणी आहे .शेतातातील पाणी बाहेर काढण्यासाठी व डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी सरकारने तातडीची मदत दिली पाहिजे .पंचनामे निश्चितपणे झाले पाहिजेत पण त्या सोबतच पैसे ही मदत रुपात देण्यात यावेत अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे .

देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली ठाकरे व पवारांना गतवर्षीच्या त्या मागणीची आठवण
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीपोटी मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना सुद्धा तातडीने शेतकऱ्यांना १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर करुन त्याचे वाटपही सुरू केले होते. तेव्हा आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हि मदत तोगडी असून शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार, बागायतीसाठी पन्नास हजार तर फळबागाला हेक्टरी दिड लाखाची मदत दिली पाहिजे अशी मागणी केली होती.त्यापेक्षाही या अतिवृष्टीने भयंकर नुकसान झाले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सध्या अधिकार आहेत.त्यानुसार त्यांनी गेल्या वर्षी केलेली मागणी पुर्ण करावी अशी आठवण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतक-यांशी बोलताना केली .

औसा तालुक्यातील अतिवृष्टीने उध्दभवलेल्या परिस्थितीची पाहाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने उध्दभवलेल्या परिस्थितीची पाहणी दि.२० आँक्टोबर औसा तालुक्यातील आशिव, काजळे चिंचोली, शिवलीमोड व बुधोडा याठिकाणी केली. यावेळी श्री . देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला .

अतिवृष्टीने उध्दभवलेली परिस्थिती भीषण आहे .अनेक पावसाळे पाहायला मिळाली परंतू इतके भयानक नुकसान कधी पाहिले नव्हते शेती पूर्णपणे खरडून गेली आहे .पण धीर सोडू नका , घाबरू नका , एकमेकांना साथ देत , हातात हात घालून पुन्हा उभे राहयचे आहे .तुम्हाला मदत मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही . मदत मिळवून देण्यासाठी प्रसंगी सरकारशी संघर्ष करु , अशा शब्दात शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे .

पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या आहेत.अशावेळी तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे.सर्व माहिती घेवून आम्ही सरकार पर्यत पोहचून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी भाग पाडू असा दिलासा शेतकऱ्यांना दिला. या पाहणी दौऱ्यात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची माहिती दिली .व राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेत शिवारात पाणी शिरल्याने खुप मोठे नुकसान झाले आहे याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संबंधित मागणी मांडावी अशी विनंती आ.पवार यांनी श्री.फडणवीस यांच्याकडे केली आहे .

यापाहणी दौऱ्यात खासदार सुधाकर श्रंगारे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड, जिल्हा परिषदेचे अध्यक्षराहूल केंद्रे , जिल्हाधिकारी जी.श्रीकांत , औसा -रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे , तहसीलदार शोभा पुजारी , माजी खा.सुनील गायकवाड, माजी आमदार पाशा पटेल , माजी आमदार गोविंद केंद्रे , माजी आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे , माजी शिवाजीराव पाटील कव्हेकर , लातूर शहर जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मगे , सुनिल कौडगे , लातूरचे माजी उपमहापौर शैलेश गोजमगुंडे , प्रेरणा होनराव , शिरीष कुलकर्णी , दीपक मठपती , नागनाथ निडवदे , जि.प.चे उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळूंके , जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता , शहराध्यक्ष लहू कांबळे , पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार , गणेश कोलपाक , भागवत कांबळे , महिला आघाडीच्या मोहिनी पाठक , सोनाली गुळबिले , कल्पना डांगे , यांच्यासह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते

राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या