लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने आज गुरुवार दि. ७ जुलै रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी तत्कालीन ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता, वेतनवाढ मिळणार असल्याचा आदेश ग्राम विकास विभागाने निर्गमित केला आहे त्याबद्दल शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले आहेत.
महाविकास आघाडी सरकारने ग्रामविकास महत्वाचे योगदान असलेल्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन (११,६२५ ते १४१२५ रुपये ) देण्यासाठी निर्णय घेतला आहे. याकरीता राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तत्कालीन ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता, वेतनवाढ मिळणार असल्याचा आदेश ग्राम विकास विभागाने निर्गमित केला आहे. त्याबद्दल शिष्टमंडळाने बाभळगाव येथे भेट घेऊन आभार मानले आहेत.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन मराठवाडा विभागीय अध्यक्ष दयानंद येरंडे, लातूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ नरवडे, आर्वीचे सरपंच धनंजय उर्फ पप्पू देशमुख, अनिल देसाई विकास पवार, अमोल बनसोडे, कृष्णा भगाडे, भागवत गरड आदी उपस्थित होते.