29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरलहान मुलांचे आरोग्य हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे

लहान मुलांचे आरोग्य हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
योग्य व पुरेसा आहार न घेतल्यास एक ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना कुपोषण हा आजार होवू शकतो. त्यामुळे या वयोगटातील मुलांना संतुलीत आहार देणे गरजेचे असून आपल्या मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे यांनी केले.

एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आयोजित स्वस्थ बालक बालिका उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कांदे बोलत होत्या. यावेळी प्राचार्य सरवनन सेना, सहयोगी प्रा. चिन्नास्वामी उपस्थित होते. गर्भधारणेच्या काळात मातेचा आहार चांगला असेल तर सुदृढ बाळ जन्मास येते. परंतु या काळातील मातेचा आहार चांगला नसेल तर कमी वजनाचे बाळ जन्मास येवून ते पुढे कुपोषीत होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणेच्या काळात मातेने संपुर्ण आहार घेणे गरजेचे आहे.

त्यासोबतच बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने बाळास निव्वळ स्तनपान द्यावे. बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी पहिले तिन वर्ष अतिशय महत्त्वाचे असतात. या काळात बाळाची शारीरीक वाढ व बौध्दीक विकास जलद गतीने होत असतो. त्यामुळे या काळात मातेच्या आहाराची व बाळाच्या पोषणाची काळजी घेणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. कांदे म्हणाल्या की, सहा महिन्यानंतर बाळास स्तनपानाबरोबर वरचा पुरक आहार द्यावा, एक ते सहा वर्ष या काळात मुलांना आहारात जीवनसत्त्वे, कर्बोदके व प्रथिने योग्य व संतुलीत प्रमाणात द्यावेत, जेवन करताना टिव्ही, मोबाईलचा वापर टाळावा व कुटूंबात एकत्र बसून जेवन करावे. अनेक माता व मुले दारिद्रयामुळे पोषक आहार घेवून शकत नाहीत. अशा माता व मुलांसाठी शासनाची एकात्मिक बाल संरक्षण योजना, प्रजनन व बाल आरोग्य सेवा योजना, एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना चालविल्या जात असल्याचे डॉ. कांदे यांनी सांगीतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका कोमल पेटकर यांनी केले तर आभार प्राची अनंतवाळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी गरोदर माता, माता व बालक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या