24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरमांजरा, तेरणा बॅरेजेसची उंची वाढवावी - आ. निलंगेकर

मांजरा, तेरणा बॅरेजेसची उंची वाढवावी – आ. निलंगेकर

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
मांजरा व तेरणा नदीकाठच्या शेतक-यांचे नुकसान कायमचे थांबविण्यासाठी नदीवरील बॅरेजेसची उंची वाढवावी व संरक्षक भिंती बांधण्यात याव्या व यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विधिमंडळात केली आहे. जिल्ह्यातून वाहणा-या मांजरा व तेरणा नदीवर बांधलेले बॅरेजेस अतिवृष्टीच्या काळात भरत असल्याने शेतक-यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर शेतजमीन खरडून शेतीचे ही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून यांकडे शासनाने लक्ष दिल्यास शेतक-याचे नुकसान टळणार आहे.

शेतक-याचे हे नुकसान कायमचे थांबविण्यासाठी या नद्यांवरील बॅरेजेसची उंची वाढविण्याची तसेच संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. यासाठी एक तज्ज्ञ समिती गठीत करून आवश्यक असणारा अहवाल मागवावा आणि यावर तात्काळ उपाय करून शेतक-याचे होणारे नुकसान टाळावे अशी विनंती माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

प्रशासनाने सतर्कता बाळगणे आवश्यक
नेहमीच येतो पुर याप्रमाणे नदी काठावरील शेतक-यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.यातून शेतक-याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे.
-मंगेश पाटील,
तालुकाध्यक्ष भाजपा शिरूर अनंतपाळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या