लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते देशाला विकसीत करुन महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यापर्यंत आणले आहे. त्यासाठी अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. आज मात्र देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी ज्यांचा काहींही संबंध नव्हता असे लोक सत्ताधारी होऊन देशाच्या सार्वभौमत्वालाच धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस पक्षाने हात से हात जोडो अभियान सुरु केले असून काँग्रेसचा कार्यकर्ता घराघरापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहोचवणार असल्याचे माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांनी सांगीतले.
जिल्हा कॉंग्रेस व लातूर तालुका कॉंग्रेस, काँग्रेस सेलच्या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थित लातूर तालुक्यातील कासारखेडा येथून ‘हात से हात जोडो’ अभियानाचा शुभारंभ दि. २३ फेबु्रवारी रोजी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, ट्वेन्टी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, रेणाचे संचालक प्रवीण पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अॅड. राजकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग चे अध्यक्ष एकनाथ पाटील, विलास साखर कारखान्याचे तज्ञ संचालक दगडूसाहेब पडीले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, जि. प. सदस्य पंडित ढमाले, पंचायत समिती सदस्य रघुनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथराव शिंदे म्हणाले, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी ३ हजार ५०० कि. मी. ची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मिर काढून जनतेचा आवाज बनण्याचे काम केले आहे. जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये ११० कि. मी. ची पायी आझादी गौरव यात्रा काढून मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी काळेकायदे व महागाई बेरोजगारी यावर आवाज उठवल्याचे सांगून काँग्रेस कार्यकर्त्यानी माजी मंत्री आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज यांनी कोरोना काळातील काम व महाविकास आघाडी सरकार असताना विकासासाठी आणलेला मोठ्या प्रमाणात विकास निधी व शेतक-यांना अतिवृष्टीचे १० हजार कोटीचे पॅकेज असे अनेक कामाच्या माध्यमातून नेत्यांनी केलेले काम हात से हात जोडो अभियानच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावे असे सांगितले. तालुका अध्यक्ष सुभाष घोडके यांनी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी लोकापर्यंत जाऊन भारत जोडो व हात से हात जोडो अभियान राबवणार असून मोदी सरकरचे भांडवलदार हिताचे व शेतकरी व मध्यम वर्गिय यांच्या विरोधातील धोरण गावागावत जाऊन जनतेपर्यंत पोहचवणार असल्याचे सांगितले. युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित लातूर जिल्हा सोशल मिडीयाचे प्रमुख प्रवीण सुर्यवंशी, विलास बँकेचे माजी व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकत्ते, अजित काळदाते, गणेश सोमाशे-पाटील, सुभाष माने, बालाजी साळुंके, प्रताप शिंदे, कमलाकर आनंतवाड, शालीक थोरमोटे, मधुकर शिंदे दगडू कांबळे, सिद्धेश्वर स्वामी, लिंबराज पाटील, बालाजी मनदुमले उपसरपंच, भिमाशंकर ढेकणे, मेघराज पाटील, नंदकुमार देशमुख, बाबासाहेब देशमुख, भुजंग शिंदे सरपंच कासारखेडा, कमलाकर शिंदे चेअरमन सोसायटी कासारखेडा, अच्युत शिंदे उपसरपंच
थोरात व्हा. चेअरमन, बाजीराव शिंदे, निळकंठ शिंदे, उमाकांत थोरात, अनिल शिंदे, जयसिंग शिंदे, गोविंद शिंदे मन्मथ स्वामी, अनिल काळे, तेजस माने, गणेश शिंदे, शिवाजी बेलकुंदे, सुमीत शिंदे, पाशाभाई तांबोळी, इक्बाल शेख, बंकटी चिकाटे, दिलीप शिंदे, संतोष शिंदे, बाबुराव जाधव, सोनेराव शिंदे, दत्ता गडदे, महेश बेलकुंदे, राम व्यवहारे, कुलदीप माने, गणपतराव माने, नरंिसग देवकत्ते, विश्वनाथ गडदे, रमाकांत स्वामी, अच्युत माने, वैभव शिंदे, इत्यादी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन पंचायत समिती रघुनाथ शिंंदे यांनी केले व आभार सुरज गडदे यांनी मानले.