21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeलातूरराज्यात भारतीय जैन संघटना घेणार पाच हजार प्लाझ्मा दात्यांचा शोध

राज्यात भारतीय जैन संघटना घेणार पाच हजार प्लाझ्मा दात्यांचा शोध

एकमत ऑनलाईन

लातूर : भारतीय जैन संघटना अर्थात ‘बीजेएस’ने कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी राज्यभरातून पाच हजार प्लाझ्मा दाते शोधण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. प्लाझ्मा दात्यांचा शोध घेऊन बीजेएस संबंधितांची यादी शासकीय यंत्रणेकडे सुपूर्द करणार आहे.

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून प्लाझ्मा दाते शोधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘बीजेएस’ ने हाती घेतलेल्या प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेमुळे कोरोना बाधितांना जीवदान देणे शक्य होणार आहे. संपूर्ण राज्यात राबविण्यात येणा-या या योजनेमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून प्लाझ्मा दाते शोधले जाणार आहेत. त्याकरिता भारतीय जैन संघटना एक फॉर्म उपलब्ध करुन देणार असून त्याद्वारे प्लाझ्मा दात्याची संमती घेतली जाणार आहे. अर्थात हे सर्व करीत असतांना संबंधितास त्याचे महत्वही पटवून दिले जाणार असून आपल्यामुळे कोरोनाबाधितांचे प्राण कसे वाचवले जाऊ शकतात, हे सांगितले जाणार आहे.

वयाची १७ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही कोरोनापासून मुक्त झालेल्या व्यक्तीस आपला प्लाझ्मा दान करता येतो. याकरिता लातूर शहराच्या विविध भागांमध्ये १५ ठिकाणी हे फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सामाजिक भावनेने प्रेरित होऊन बीजेएसच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात लातूर शहर व जिल्ह्यातील कोरोनापासून मुक्त झालेल्या समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यात आपले उचित योगदान द्यावे, असे आवाहन सुनील कोचेटा, अभय शहा, भारतीय जैन संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष केयूर कामदार, डॉ. कंडारकर, डॉ. पी. के. शहा, पारस चापसी, सुरेंद्र कंडारकर, सुरज शहरकर, अशोक सोलंकी, श्रेयंस बोरा, हेमंत रामढवे, पारस वरखेडकर, संतोष उमाटे, किशोर जैन यांसह बीजेएसच्या लातूर जिल्ह्यातील पदाधिका-यांनी केले आहे.

अरविंद केजरीवाल : दिल्लीत हॉटेल सुरू करण्याचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या