22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरलातूर रोड-जळकोट-बोधन रेल्वेमार्गाचा प्रश्न लोकसभेत मांडणार

लातूर रोड-जळकोट-बोधन रेल्वेमार्गाचा प्रश्न लोकसभेत मांडणार

एकमत ऑनलाईन

जळकोट : तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६ च्या रेल्वेअर्थसंकल्पात लातूर रोड-जळकोट -मुखेड-बोधन या अतिशय महत्वाच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी दिली होती. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे तसेच हा रेल्वेमार्ग १३४. ५ किलोमीटर लांबीचा होणार आहे. यासाठी २४०९ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे पंरतू आता या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा महत्वाचा आहे या मार्गाचे भूसंपादनाचे काम तसेच रेल्वेमार्गाचे काम प्रत्यक्ष सुरू व्हावे यासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन हा रेल्वेमार्ग लवकर मार्गी लावण्यासाठी हा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याची माहिती खासदार सुधाकर श्रंगारे यांनी जळकोट येथे आयोजीत पत्रकार परीषदेत दिली.

हा मार्ग व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे़ निजामकाळात याचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते परंतू हा मार्ग पूर्ण होऊ शकला नव्हता़ परंतू हा मार्ग २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केला होता, तसेच या कामाच्या सर्वेसासाठी १९ लाख रूपयांचा निधीही मंजूर केला होता. आता या मार्गाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिली. हा रेल्वेमार्ग अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे आपण रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद करावी़ या रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आपण रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटणार असल्याची माहिती खासदार सुधाकर श्रंगारे यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, भाजपा अनुसचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे, प्रा. पंडीत सुर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, भाजपा युवा मोर्चाचे सत्यवान पांडे,विश्वनाथ चाटे, भाजपाचे कार्यकर्ते भुरे माधव, रिपाईचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, रामेश्वर पाटील, मंगेश हुंडेकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मालुसरे, गोंन्टे, रवी सोप्पा, डॉ. श्रीकांत सोप्पा, अनुसूचित मोर्चाचे जळकोट तालुकाध्यक्ष भाऊराव कांबळे, गुट्टे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निधी उपलब्ध झाल्यास असा होणार रेल्वेमार्ग
लातूर रोड – जळकोट – बोधन या रेल्वेमार्गाचे काम लवरकच सुरू होणार असल्याचे संकेत आता मिळत आहेत, कारण दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने हा सर्वे करण्यात आला आहे़ या रेल्वेमार्गावर बोधन, सलोरा, बिलोली, तळणी, नर्सी, आलुवडगाव, मुखेड, लादगा, जळकोट, कुमठा, हाळी, असे रेल्वेस्टेशन असणार असून पुढे चाकूर जवळ हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. तसेच लातूर रोड-बोधन या रेल्वेमार्गासाठी ७३२ हेक्टर जमीन लागणार आहे़ यातील ४८५ हेक्टर जमीन ही कोरडवाहू आहे तर उर्वरीत बागायती तसेच अन्य आहे, त्यामुळे आता दक्षीण मध्य रेल्वेने या मार्गाच्या उभारणीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करीत आहे.

या मार्गावर ९३ ब्रीज होणार आहे. यातील मोठे पुल हे १५ आहेत तर ७८ पूल हे लहान आहेत. या रेल्वेमार्गाच्या एका किलोमिटरसाठी १७ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी लागणार आहे़ १३४.५ किलोमीटरसाठी २४०९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. आता सर्व स्ट्रक्चर तयार झाले असून खासदारांनी पाठपुरावा केल्यास नक्कीच या रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या