कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली.
आमदार म्हणाले की, कासारशिरसीला तालुक्याचा दर्जा मिळवून देऊन या भागातील ६८ गावांचा प्रश्न अडचणी प्रामुख्याने सोडवून औद्योगिक वसाहत निर्माण करुन रोजगाराच्या संधी बेकारांना मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिरसीकरांनी रेल्वे मार्गाचा प्रश्न वर्तमानपत्रातून लावून धरल्याने आमदारांनी लगेच आपल्या गावा प्रती असलेला अभिमान जागृत झाला.
त्यांनी नवीन रेल्वे मार्गाचे संकेत लोकांसमोर मांडली. नवीन रेल्वे मार्ग कासारशिरसीहून जाण्यासाठी आपला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, जिल्हानी बागवान, धनराज होळकुंदे, नारायण ढोबळे, पत्रकार महेश गरंडे आदी उपस्थित होते. यावेळी ६८ गावांतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?