26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home लातूर लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

एकमत ऑनलाईन

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, वकील नागरिकांसह समाजातील सर्व स्तरातून औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रश्नी करण्यात येणा-या विविध आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. पुढील महिनाभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान याचाच भाग म्हणून संघर्ष समितीच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट देऊन त्यांनी या प्रश्नी सरकार दरबारी पाठपुरावा करावा समस्त औसेकर त्यांचा सोबत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी ही रेल्वे तर औसातूनच धावणार असा शब्द समितीला दिला आहे.

२०१४ साली तत्कालीन आमदार बसवराज पाटील यांनी औसाला राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेला जोडण्यासाठी प्रयत्न केले. यात राष्ट्रीय महामार्ग औसाला जोडण्यात यश आले आणि रेल्वेबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठपुरावा करीत लातूर-गुलबर्गा या संभाव्य रेल्वेसाठी पाठपुरावा केला. लातूर-औसा-लांमजना-किल्लारी–उमरगा-आळंद मार्गे गुलबर्गा असा १४५ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या सर्वेबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.याला यश ही मिळाले सदर मार्गाचा सर्वे मंजूर होऊन या कामासाठी सर्वे निधी मंजूर झाला त्याची नोंद त्याच वेळी रेल्वे बोर्डाचा पीक बुकात नोंद झाली मात्र काँग्रेस सरकार गेले मात्र त्याच रेल्वेबाबत तत्कालीन खासदार रवी गायकवाड यांनी ही सन २०१७ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट देऊन त्यांना पत्र देऊन या मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती तसे बोर्डाकडून निर्देश ही देण्यात आले होते .

मात्र अचानक नाव लातूर ऐवजी लातूर रोड ते गुलबर्गा नाव बदलून सर्वे करण्याचा नवा घाट घालण्यात आला. याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्व्हे करण्यास आलेल्या टीमच्या दोन वेळा भेटी घेत आणि रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिका-यांंना बोलून रेल्वेकडून झालेली चूक लक्षात आणून दिली आहे मात्र अद्याप कुठलाच ठोस निर्णय झाला नाही यामुळे स्वत: आमदार पवार यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही सर्व हकीकत सांगितली मुळात रेल्वेचे होणारे नुकसान, अतिरिक्त खर्च आणि उद्देश याला बगल देऊन होत असलेला प्रकार निदर्शनास आणून दिला यावर रेल्वेमंत्र्यांनी १५ डिसेंबर रोजी अभिमन्यू पवार यांना दिल्लीला बोलावले आहे .

या प्रश्नावर औसेकरांनी रविवारी समितीची स्थापना केली. यावेळीं रेल्वे हक्क संघर्ष समितीचे खुदंमीर मुल्ला, आकाश पाटील, अ‍ॅड. शहानवाज पटेल, गणेश माडजे, अ‍ॅड. समियोद्दीन पटेल, दीपक चाबुकस्वार, मुज्जफरअली इनामदार,राजू पाटील, जयराज कसबे, गोपाळ धानुरे, नवाब खादर, शादाब हन्नूरे, अ‍ॅड. सचिन मिटकरी, अ‍ॅड. फय्याज पटेल, अभयंिसह बिसेन, बाबा पटेल, पाशा शेख, मिसबा पटेल, मोहमद मुगले, नदीम सय्यद, यासह समितीतील सदस्यांनी आमदार पवार यांना रेल्वेबाबत पांिठबा दिला. या आंदोलनास युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष हणमंत राचट्टे यांनीही दिला पांिठंबा

लातूर रोड नव्हे तर लातूर-गुलबर्गा मार्गाचा सर्वे मंजूर
कांही दिवसापासून रेल्वे मार्गावरून चर्चा सुरू आहेत मात्र मुळात ज्या चर्चा आहेत त्या चुकीच्या आहेत लातूर रोड ते गुलबर्गा या मार्गाचा सर्वे असे सांगण्यात येते मात्र तो तसा सर्व्हेच नाही तर लातूर-गुलबर्गा असा सर्वे आहे ती कोठून जाणार याचा विचार केला तर रेल्वे हितासाठी जे महत्वाचे असते ते रेल्वे बोर्ड ठरविते आणि मी माझ्या काळात लातूर-गुलबर्गा मार्ग मंजूर करून घेतला. तसे निवेदन खुद्द प्रधानमंत्री नरेंद मोदी यांना दिले आणि ते मंजूरही झाले. लातूर रोडवरून ती रेल्वे धावूच शकत नाही असा दावा माजी खासदार सुनील गायकवाड यांनी केला. मार्गाबाबत सुरू असलेल्या मार्गाची पोलखोल करीत रेल्वे कुठूनही गेली तरी रेल्वेसह जिल्ह्याचे हित महत्वाचे असते आपण जरी एका मतदारसंघाचे आमदार असलो तरी जिल्ह्याचे नेते म्हणून घेताना संकुचित विचार न करता समतोल विचार करावा लागतो अशी टिका माजी पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव न घेता माजी खासदार.सुनील गायकवाड यांनी औसा येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.

खर्च, प्रवाशी, उद्योग, कारखाने याचा विचार करूनच रेल्वे धावते. ती डोंगरातून धावत नसते त्याला जवळून हायवे लागतो त्यामुळे लातूर रोड नव्हे तर लातूरहून मंजूर मार्गावरूनच रेल धावणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत माजी खासदार गायकवाड यांनी व्यक्त केले.देशात प्रवाशी,उद्योग, आणि आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने अनेक रेल्वे बोर्डाने बंद केल्या आहेत कारण रेल्वे ही आर्थिक आणि व्यवहारिक समतोल ठेवीत चालते. मुळात लातूर-गुलबर्गा हा सर्वे अगोदर मंजूर होता आजची परिस्थिती पहिली तर लातूर हा रेल्वेच्या माध्यमातून देशाचा दक्षिण भागाला जोडणार आहे. मुळात लातूर स्टेशन ते लातूर रोड याचे अंतर पाहिले तर फार मोठा फरक आहे. ज्या लातूर मध्ये दोन मेडिकल कॉलेज आहेत साखर, तेल, यासह देशात तुरीची बाजारपेठ ज्याचा भाव हा देश घेतो. लाखों टन सोयाबीन उत्पादन करून ज्या बाजारपेठेचे येते ती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पूर्णत्वाकडे असणारा बोगी कारखाना एक हब असलेल्या शहराला आणि या शहराला सोडून ज्या मार्गी रेल्वे धावणार आहे त्या मार्गावर ती तालुके त्याच प्रमाणे उद्योग आणि प्रवाशी आणि कमी अंतर खर्चिक भाग नसावा हे सर्वे करताना पाहिले जाते.

२०१७ साली मी खासदार म्हणून रेल्वेच्या या मागणीला पंतप्रधानांकडे केली होती आणि ती मागणी मान्य झाली होती आणि ती याच मार्गाची आहे. नैसर्गिक न्याय आणि मंजूर रेल्वे यात होणारी दिशाभूल चुकीची आहे. या मार्गाबाबत मी पाठपुरावा केला साधा माझा उल्लेख नाही दुरून कुणाचा संबंध नाही त्यांनी मार्ग बदलावा आणि दावा करावा हे चुकीचे लातूर-औसा-लांमजना-निलंगा-कासार शिरशी-उमरगा हाच योग्य आणि मंजूर मार्ग आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या संपर्क कार्यालयात माजी खासदार सुनील गायकवाड यांनी सोमवारी सायंकाळी आठ वाजता पत्रकार परिषद घेऊन लातूर-गुलबर्गा मार्गाबाबत कागदोपत्री पुरावे आणि भूमिका स्पष्ट केली आहे.

निलंगा मतदारसंघात रेल्वेचे गाजर दाखविणे बंद करा
मागच्या दोन वर्षांपासून निलंगा शहर व मतदारसंघातील रस्त्यांची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. निलंगा शहरातील गल्ली बोळातील रस्ते नाल्या खोदून टाकल्याने येथील नागरिकांचे जगणे त्रासदायी झाले आहे. नाल्याची घाण रस्त्यावर येऊन आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबीकडे दुर्लक्ष करून निलंगा मतदारसंघातील नागरिकांच्या कोपराला गूळ लावून रेल्वेचे गाजर दाखविण्याचे काम आमदारांनी बंद करावे, असे आवाहन डॉ अरंिवंद भतांबरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे .

मागच्या आठ दहा दिवसांपासून प्रसध्दिी माध्यमातून निलंगा व औसा मतदारसंघात रेल्वे धावणार असे वाचायला मिळत आहे. आता कोठे रेल्वेच्या सर्वेचे काम सुरू आहे. रेल्वे येण्याची बाब फार किचकट व प्रदीर्घ चालणारी आहे. परंतु निलंगा मतदारसंघातील नेते जणू चार दिवसांत रेल्वेचे उद्घाटन आहे असेच वागताना दिसत आहेत. दोन्ही मतदारसंघातील भाजपचे नेते रेल्वे कोठून कशी धावणार हे सांगत आहेत. एक जण लातूररोड, शिरुर अनंतपाळ, निलंगा, गुलबर्गा धावणार सांगत आहेत. तर दुसरे लातूर औसा, उमरगा, अशी धावणार असे सांगत आहेत. सामान्य माणसाला ही रेल्वेलाईन आहे. का? गावातील पाणंद रस्ता होत आहे. असा प्रश्न त्यांना पडत आहे. जेव्हा जेव्हा कोणत्या निवडणूका येतात तेव्हा जनतेला रेल्वेचे गाजर दाखवले जाते.

कैगोपीनाथ मुंडे यांनी बीडला रेल्वे आणणार असा त्यांचा शब्द कित्येक वर्षानंतरही तसाच आहे. आणखीन त्या ठिकाणी रेल्वेचे काम पूर्ण झाले नाही. रेल्वेबोगी कारखाना एक वर्षात पूर्ण करुन त्या ठिकाणी ५० हजार तरुणांना कामाला लावू या आश्वासनाचे काय झाले. शिरुरअनंतपाळ येथून रेल्वे जाणार ही बाब अतिशय चांगली असली तरी आगोदर विकासापासून कोसो दूर असलेल्या शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्याचा विकास करा. शिरुर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंजूर करून उद्घाटन केले होते. ते रुग्णालय व औराद शहाजनी येथील रुग्णालय अद्याप आमदार सुरु करु शकले नाहीत. मागच्या पाच वर्षांत राज्यात सत्ता होती. निलंग्याचे आमदार पालकमंत्री होते. त्यांनी या काळात निलंगा मतदारसंघासाठी केलेले एक तरी ठळक काम सांगावे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात डॉ अरविंद भातांब्रे यांनी नमूद केले आहे

 

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या