19.1 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home लातूर 'जाकीर'संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

‘जाकीर’संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

एकमत ऑनलाईन

निलंगा (लक्ष्मण पाटील ) : तालुक्यातील औराद शहाजानी येथील औराद-बिदर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला गेल्या तीन दिवसांपासून आशा थंडीच्या दिवसात अगदी बेवारसासारखे पडलेल्या एका मनोरुग्णाला जाकीर सामाजिक संस्थेच्या वतीने निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गेल्या तीन दिवसांपासून थंडीच्या दिवसात कुडकुडत एक बेवारसासारखे मनोरुग्ण रस्त्याच्या कडेला पडलेले असल्याची माहिती सलमान पठाण यांनी सामाजिक कार्यकर्ते जाकीर शेख यांना दिली लागलीच जाकीर शेख त्यांचे सहकारी लखन लोंढे, कृष्णा पळसे यांनी पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी घटनास्थळी गेले असता अगदी एखादी वस्तू फेकल्या सारखे, थंडीपासून वाचण्यासाठी पोते गुंडाळून घेऊन पडलेली व्यक्ती आढळून आली लागलीच त्याला उचलून घेऊन पाणी पाजवून रुग्णवाहिका बोलावून वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. कदम यांच्या सल्ल्यानुसार निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हा अनोळखी व्यक्ती गत तीन दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत होता. निलंगा येथील जाकीर सामाजिक संस्थेच्या पदाधिका-यांनी त्यास उठवून पाणी, दूध व बिस्कीट दिले आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी व तापासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय आधिकारी डी. एस. कदम यांनी सांगितले.

संस्थेची समाजोपयोगी उपक्रमात सहभाग
गेल्या अनेक वर्षांपासून जाकीर सामाजिक संस्थेच्या वतीने अगदी बस स्थानक दत्तक घेऊन स्वच्छता अभियान राबविणे. गत वर्षी थंडीच्या दिवसात निलंगा बसस्थानक येथे चादरी वाटप करणे आदी अनेक सामाजिक कामे आणि लॉकडाऊनमध्ये गरजूंना राशन किट वाटप करणे अशी अनेक समाजोपयोगी सामाजिक उपक्रम या संस्थेकडून सतत राबविण्यात येत असल्याने संस्थेचे प्रमुख जाकीर शेख यांच्यासह सर्व टीमचे निलंगा शहरासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

शीघ्र कृतीची गरज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या