25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरमांजरा परिवाराने जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडवली

मांजरा परिवाराने जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडवली

एकमत ऑनलाईन

रेणापूर : लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा साखर कारखान्याचे रोपटे लावले त्याचा आज वृक्ष उभा राहिला असून आज मांजरा साखर परिवाराने राज्यात नावलौकिक मिळवत समाज घडविण्याचे कार्य करीत आहे. जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडविली आहे. जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात साखळी उभी करून लोकांसाठी कार्य करण्यात वेगळा आनंद आहे,असे प्रतिपादन मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बोलताना केले.

बुधवारी दि. ६ जुलै रोजी रेणा साखर कारखान्याच्या ३० ३० केएलपीडी आसवानी प्रकल्पाचा विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे, रेणाचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, ट्वेण्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले,रेणा साखरचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, उपस्थित होते

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात साठवण तलाव निर्माण झाले त्यामुळें शेती पाण्याखाली आली उसाचे उत्पादन वाढले. यावर्षी उसाचे गाळप ५७ लाख मेट्रिक टन झाले. उच्चांक प्रस्थापित केला ऊस उत्पादक शेतक-यांंना कोट्यवधी रुपये देण्याचा विक्रम मांजरा साखर परिवाराने केला. याचे सर्व श्रेय लोकनेते विलासराव देशमुख यांच्याकडे जाते असे सांगून माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, लवकरच आपण आपल्या परिवाराकडून अंतिम एफआरपी देणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे म्हणाले की त्यांनी नियोजित ३० केएलपीडी आसवानी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी साखर कारखाना प्रयत्न करणार असून अगदी अल्प वेळेत या प्रकल्पास जिल्हा बँकेने मदत केल्याचे सांगीतले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून या नविन विस्तारीकरण प्रकल्पामुळे वैभवात भर पडली आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले

यावेळी रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही, मोरे, विलास साखर कारखान्याचे २ चे कार्यकारी संचालक पवार, विलास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देसाई , रेणा साखर कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अनिल कुटवाड यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक बी व्ही. मोरे यांनी मानले.

जिल्ह्यात आर्थिक विकासाला चालना : आमदार धीरज देशमुख
लोकनेते विलासराव देशमुख यांनी वृक्ष उभा केला. त्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करीत मांजरा साखर परिवाराने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साखर कारखानदारी उभी करून आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतक-यांंना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झाले आहे असे आमदार धीरज देशमुख यांनी सांगत जिथं जिथं संस्थेत दिलीपराव देशमुख यांचा स्पर्श होतो तिथली वास्तू चांगली चालते, असे सांगून आम्ही शब्द दिला होता ऊसाचे टिपरू शल्लिक राहणार नाही तो शब्दाचे तंतोतंत पालन केला आहे असे सांगून उच्चांकी गाळप करीत शेतक-यांंना रक्कम देण्याचा विक्रम याच मांजरा परिवाराने केला आहे असे ते यावेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या