औसा : कोरोना विषाणूंचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून औसा शहरासह तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्स नियमांचे म्हणावे तसे पालन होत नसल्याने आता समूह संसर्गामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार झपाटयाने वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता दर रविवारी औसा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे.
रविवारी औसा बाजारपेठ बंद करण्यात येणार असल्याचे स्पीकरवरून व्यापारी व ग्राहकांना माहितीसाठी सांगण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जनतेनीच आता काळजी घेणे आवश्यक आहे. शासनामार्फत सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असूनही औसा येथील कोव्हिड सेंटरमध्ये १०० बेडची सुविधा असून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंगद जाधव यांनी सध्या औशाच्या कोव्हिड सेंटर मध्ये ९९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती सोशल मीडिया वरून दिली आहे.
शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता दर रविवारी औशाची बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याने सर्व व्यापा-यांनी आपले व्यवहार रविवारी बंद ठेवावेत आणि व्यापारी व ग्राहकांनी या बाबीची नोंद घ्यावी, असे आवाहन औसा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात जिल्हा बँकेची तिजोरी फोडली