26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeलातूरदेवणीत अवैध दारू विक्रेत्यांची चलती

देवणीत अवैध दारू विक्रेत्यांची चलती

एकमत ऑनलाईन

उदगीर : बबन कांबळे
देवणी तालुक्यात सध्या अवैध धंद्यांचे थैमान घातले असून यासंदर्भात नाईलाज म्हणून नागरिकांनी अनेकदा वरिष्ठाकडे तक्रार केली. वरिष्ठ अधिका-यांनी तात्काळ पोलिस प्रशासनाला अवैद्य दारूविक्रीच्या दुकानावर कारवाई करण्याचे आदेश दिले. गंमत म्हणजे शहरात जवळपास १५ ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करतात. यादरम्यान अवैध देशी दारूचे दुकाने राजरोसपणे चालतात आणि या अवैध दुकानांना पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद आहे. अवैध धंदे चालणार नाहीत या शब्दात वरिष्ठ पोलीस अधिका-याने सुनावले मात्र पोलिस प्रशासनाने नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलिसांकडून किरकोळ दुकानदारावर थातुरमातुर कारवाई केली जाते. वास्तविक पाहता ही कारवाई म्हणजे जखम मांडीला मलम शेंडीला म्हणतात त्याप्रमाणे झालेली आहे. अवैध दारू विक्री एके ठिकाणी तर कारवाई दुस-या ठिकाणी अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. एवढ्या मोठ्या देशी दारूची विक्री होत असताना प्रशासनाकडून या संदर्भत कठोर कारवाई का केली जात नसावी हे सर्वांना माहीत आहे. देवणी येथील वरिष्ठ अधिका-याच्या आणि प्रत्येक बीट अंमलदार आशीर्वादामुळे चक्क वरिष्ठ अधिका-ाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याची ंिहमत देवणी पोलीस प्रशासनामध्ये निर्माण झाली आहे. देवनी शहरात चालतो सावळा गोंधळ! अधिकारी देतोय बळ? अशा पद्धतीची चर्चा आहे.

देवणी तालुक्यात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. सर्व धंदे चालू असून देखील या बाबीकडे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हे गांभीर्याने का पाहात नसावेत .? हा मोठा प्रश्न आहे. देवणी वलांडी तळेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे अवैध देशी दारूचा व्यवसाय चालू असतानाही बीट जमादार यांना वरिष्ठ पोलीस अधिका-यांचा आशीर्वाद आहे का? असेही देवणी तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला वाटू लागले आहे. संपूर्ण देवणी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावोगावी सर्व प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत .जणू अवैध धंद्याची राजधानी देवणी बनते की काय ?अशी चर्चा सुरू आहे. शेजारी आंध्र, प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा असल्यामुळे या राज्यातून अवैद्यधंदे करणारे मोठ्या प्रमाणात येतात आणि देवणी शहरासह तालुक्यात बिनधास्तपणे हे अवैध धंदे सुरू आहेत.

मटका, गुटखा, जुगार, अवैध प्रवासी वाहतूक, अवैद्य दारू विक्री हे सर्वकाही राजमान्य आहे की काय? अशाच थाटात हे धंदे सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अशा प्रकाराच्या विरोधात असल्याची चर्चा आहे. तसेच हे प्रकार मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यासाठी स्वातंत्र पथक निर्माण केले असल्याचे बोलले जात आहे. हे पथक इतर तालुक्यात धाडी टाकून आपली कर्तबगारी दाखवत आहे. ही कर्तबगारी देवनी शहरासह तालुक्यात का दाखवली जात नसावी ? हाही मोठा प्रश्न आहे. तालुक्यावर या पथकाची खास मेहेरनजर आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता या पूर्वी देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उद्योगधंदे करण्यासाठी चालना देण्यासाठी लाच घेताना वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यावर कारवाई झाली होती. मात्र त्याचा तिळमात्र परिणाम झाला नाही.

तालुक्यातील सर्वसामान्य माणूस लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री, जिल्हा अधिकारी यांच्यापर्यंत अवैध धंद्याची तक्रार करतो. तरीही ना शासन, ना प्रशासन , ना पोलिस यंत्रणा दखल घेत नसल्यानेकिंवा कारवाई करीत नाहीत. यामुळे आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही, आशा थाटात देवनी शहरासह वलांडी भागात हे सर्व अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत. कर्नाटकात भागातून मोठ्या प्रमाणात माणकेश्वर, टाकळी बोंबळी वलांडी, मार्ग गुटका राज्यभरात पसरला जातो .! हे जग जाहीर असतानाही याकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच लखनगाव, बोरोळ,तोगरी, सिंधीकमाठ, लासोना, सय्यदपुर,जवळगा,माटेगडी मार्ग मटका चालक देवनी, वलांडी शहरात अवैध धंदे जोमात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या