27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home लातूर पावसामुळे शेतीला आले तलावाचे स्वरूप

पावसामुळे शेतीला आले तलावाचे स्वरूप

एकमत ऑनलाईन

देवणी (प्रा. रेवण मळभगे) : तालुक्यात मान्सून परतीच्या पावसाने कहर केला असून तालुक्यात आजपर्यंत सरासरी ८८६.६६ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी १०९.७७ टक्के टक्क्यापर्यंत पोहोचली आहे.पावसाने तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानाची आठशे मिलिमीटरची सीमा ओलांडली आहे. मंगळवारी तालुक्यातील बोरोळ या महसूल मंडळात १५५ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस होऊन ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पावसामुळे बोरोळ येथील एक पाझर तलाव पण फुटला आहे. शिवाय तालुक्यातील लासोना ,हेळंब, नेकनाळ, भोपणी या गावांना जोडणारे पूल रस्ते नाले उखडल्याने ग्रामीण भागातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या पावसामुळे तालुक्यातील मुख्य सोयाबीन या पिकाच्या काढणीचा हंगाम आल्याने फार मोठा फटका बसत आहे. परतीच्या पावसाने तालुक्यातील मांजरा व देव आणि मानमोडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय तालुक्यातील धनेगाव उच्चस्तरीय बंधारा भोपनी मध्यम प्रकल्प यांच्यासह साठवण व पाझर तलाव आणि विहिरी व बोर यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

तालुक्यातील आनंदवाडी , कवठाळा हेळंब, जवळगा या गावातील शेतातील सोयाबीन पिकाला फार मोठा फटका बसला असून पिके पाण्यामध्ये उभी आहेत. आंबेगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव, विस्तार अधिकारी ए. डी. कट्टेवार , विस्तार अधिकारी व्ही. एस. कांबळे तसेच पंचायत समिती व तहसील कार्यालय येथील कर्मचारी उपस्थित होते.. या वेळी उपस्थित शेतक-यांनी आम्ही कसं जगायचं असा टाहो फोडला.

अंबेगाव व परिसरात आणि देवणी तालुक्यातील बहुतांश गावात रात्री १२४ मी मी आणि बुधवारी सकाळी १० वाजता १४० मी मी पाऊस पडल्यामुळे शेतक-यांची सर्व पिके पाण्याखाली असून नदीकाठच्या सर्व शेतक-यांच्या पिकांबरोबर जमिनीही वाहून गेल्या आहेत.  सदर नुकसान ग्रस्त भागातील सर्व शेतक-यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी गावातील शिवाजीराव पडिले, माणिक शिंदे, व्यंकट शिंदे, राजकुमार जाधव, राजकुमार बिरादार व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

निटूर येथे नाल्या तुंबून घरात पाणी
बुधवारी झालेल्या पावसामुळे नाल्याचे पाणी तुंबून विनायक देशमुख यांचा घरात पाणी शिरले. यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. पावसाचे पाणी जमीनीचा शेताचा बाहेर पाणी पडले. गावशेजारील ओढाही तुडूब भरून वाहिला. निटूर ते निटूर मोड रस्त्याच्या पुलावरून पाणी जात आसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

अंबेगाव येथे पिकांचे मोठे नुकसान
देवणी तालुक्यात वार्षिक सरासरी पाण्याच्या पातळीचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारपर्यत झालेल्या मुसाळधार पावसामुळे शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबेगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके , तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव, विस्तार अधिकारी ए. डी. कट्टेवार, विस्तार अधिकारी व्ही. एस. कांबळे यांनी पहाणी केली. शेतक-यांंची सर्व पिके पाण्याखाली असून नदीकाठच्या सर्व शेतक-यांच्या पिकांबरोबर जमिनीही वाहून गेल्या आहेत सदर नुकसान ग्रस्त भागातील सर्व शेतक-यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतक-यांतून होत आहे. या वेळी आंबेगाव येथील शिवाजीराव पडिले, माणिक शिंदे, व्यंकट शिंदे, राजकुमार जाधव, राजकुमार बिरादार व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. संगम येथील शेतकरी युवराज कुसनुरे यांचा सात एकर ऊस भुईसपाट झाला आहे

मंडळाधिकारी यांच्या पुढाकाराने अनर्थ टळला
वलांडी येथील पाझर तलाव क्रमाक १ फुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळताच मंडळअधिकारी शिवाजी हेळंबे यांनी तात्काळ भेट देऊन सांडव्याचे जेसीबीने खोलीकरण करुन पाण्याचा निचरा केल्याने फुटण्याचा अनर्थ टळला. यावेळी तलाठी अबरार शेख, रोजगार सेवक वठ्ठिल बनसोडे, शेतकरी दत्ता डुबे, कृष्णा डुबे, विरभद्र सज्जनशेट्टे उपस्थित होते.

घरावर वीज पडून नुकसान
सोमवारी रात्रीच्या सुमारास देवणीच्या विविध भागांत मुसळधार पावसासह विजेचा जोरदार कडकडाट पाऊस झाला. तालुक्यातील बोळेगाव येथील भिमराव चन्नपा बिरादार यांच्या घरावर सोमवारी रात्री वीज पडून मालमत्ता व विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. जिन्याच्या टावरला छेदून वीज थेट घरात कोसळली आहे.

नागरिकांनीही स्वतःची काळजी घ्यावी : अशोक चव्हाण

ताज्या बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन  : चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग...

पावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. घोणसी परिसरामध्ये दोन तासांत तब्बल १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली,...

ललित-54 वाण यशस्वी : प्रत्येक हंगामात भेंडी लावा आणि अधिक नफा मिळवा

छत्तीसगड : छत्तीसगडच्या देवी राजमोहिनी कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डीन डॉ. व्ही.के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ललित-५४ प्रकारातील भेंडी ची चाचणी यशस्वी झाली आहे....

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

पावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. घोणसी परिसरामध्ये दोन तासांत तब्बल १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली,...

किल्लारी, मारुती महाराज हे दोन्ही कारखाने सुरूकरा

औसा : औसा विधानसभा मतदारसंघातील वाढते ऊसाचे क्षेत्र व ऊस उत्पादक शेतक-याचा ऊस वेळेवर गाळप होण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील सध्या बंद असलेला किल्लारी व बेलकुंड...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : शिरूर अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मांजरा, घरणी नदीसह नाल्याकाठच्या सोयाबीनला या पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन सह खरिप पिकांचे मोठे...

नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा

देवणी : तालुक्यातील वडमुरुंबी ,दवण्णहप्पिरगा, अंनतवाडी वंलाडी या गावांना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रविवार दि. २० सप्टेंबर रोजी शेतक-यांना भेटून शेतसंवाद साधून निवेदने...

मांजरा नदी पाणी प्रवाहात अडचणी वाढल्याने धरण भरण्यास अडचण

कळंब (सतीश टोणगे): बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गावांचा पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा धरणास पाणी पुरवठा करणा-या मांजरा नदीचा पाणी प्रवाह कमी...

लातूर-नांदेड रस्ता तातडीने दुरुस्त करा

लातूर : लातूर-नांदेडदरम्यान महामार्गाचे काम सुरु होण्यास वेळ लागणार असेल तर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांकृतिककार्य मंत्री...

शहरातील पथदिव्यांना बसणार टायमर

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पथदिव्यांना टायमर बसविण्यात येणार असून यामुळे पथदिवे स्वयंचलित पद्धतीने बंद- चालू होणार आहेत. यातून विजेची बचत होणार...

अभिनेत्री आशालता यांच्या निधनाने अष्टपैलू, गुणी कलाकार गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 22 : मराठी  चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांच्या निधनाने अष्टपैलू आणि गुणी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता...

लातूर जिल्ह्यात २८५ नवे रुग्ण; आणखी १० बाधितांचा मृत्यू

रिकव्हरी रेट सुधारला : जिल्ह्यातील १४ हजार ६७४ रुग्णांपैकी ११ हजार २६२ रुग्णांनी कोरोनावर केली मात लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...