18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरराष्ट्रीय महामार्गाला आले तलावाचे स्वरुप

राष्ट्रीय महामार्गाला आले तलावाचे स्वरुप

एकमत ऑनलाईन

पानगांव : पानगांव (ता.रेणापूर) येथूनजाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रं.३६१ एच वर संभाजी चौक ते वैभव बिअर बार दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतक-याने शेतात पाणी घुसू नये म्हणून जेसीबीने बांधावर नाला खोदुन निघालेली मातीचा बांध रस्त्यावरच घातल्याने पाच मिनीट पडलेल्या पावसाने रस्त्यावर गुडघाभर साठल्याने तलावाचे स्वरुप आले होते. यामुळे वाहनधारकांची त्रेधापीठ उडत असून व्यापारी,प्रवाशी,आणि गैरसोय होत आहे.

उमरगा ते खामगांव राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१एच हा २०१८ ला मंजूर करण्यात आला. एका बाजूने उमरगा ते खरोळा फाट्यापर्यंत तर दुस-या बाजूने धर्मापुरीकडून येणारा पानगांव रेल्वे गेट पर्यंत रस्ता पूर्णत्वास आला आहे.पानगांव रेल्वे गेट पासून ते खरोळा फाटा दरम्यानचा केवळ १४ कि.मी इतकाच रस्ता शेतक-यांच्या मावेजाचे कारण पुढे करीत महामार्ग विभागाने करण्याचे थांबविले आहे.

सन २०१८ ला राज्य महामार्ग विभागाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाला वर्ग केल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचे मजबुतीकरण होऊ शकले नाही त्यामुळे खरोळा फाटा ते पानगांव दरम्यानच्या रस्त्याची चाळन झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. हा महामार्ग पानगाव शहरामधून जात आहे. किमान पानगाव शहराअंतर्गत येणारा आण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वेगेट पर्यंतचा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पानगावकरांच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन अंदोलने करून केली. तरीही कार्यवाही होत नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या