22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरस्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार

स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : आगामी येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना केले. दि. १३ जुलै रोजी आयोजित लक्ष्मीनारायण मंदिर मंगल कार्यालय, अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते .

मंचावर जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, बालासाहेब पाटील आंबेगावकर, अ‍ॅड. भारतभूषण क्षीरसागर, राजाभाऊ शिंदे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, टी. एन. कांबळे, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, बालाजी बैकरे, दिपक शिंगडे, युवक जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुका अध्यक्ष दयानंद पाटील, डी.के जाधव, महिला शहराध्यक्ष सौ शाहुताई कांबळे, जिल्हा सरचिटणीस इमोरज भाई पटवेकर, अ‍ॅड. सादिक शेख, सचिन पडिले, तानाजी राजे, फेरोज शेख, आशिष तोगरे, युवती, महिला, युवक सेल, सामाजिक न्याय विभाग, ग्रंथालय, सेवादल व सर्व सेल पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की,कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी ‘वन बूथ २५ युथ’ मोहिमेला गती देण्याबाबत तसेच सभासद नोंदणी कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात यावे. यावेळी अहमदपूर शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही याप्रसंगी घेतल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या