27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरचिखूर्डा सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांची घेतली भेट

चिखूर्डा सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांची घेतली भेट

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील चीखुर्डा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणुकीत संत बालनाथ स्वामी शेतकरी शेतमजूर ग्रामविकास पॅनलचे सर्वच १३ उमेदवार विजयी झाले आहेत. पॅनल प्रमुख विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. त्याबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, इंदिरा सहकारी सुत गिरणीचे चेअरमन कदम बाळासाहेब, विश्वास कदम, राजाभाऊ काळे, सतीश कदम, गोरोबा कापसे, राजेश जाधव, लाला कदम, घाडगे कपिंद्र, घाडगे दत्तात्रय, घाडगे बब्रूवान, घाडगे महादेव, ढोले महादेव, शेख मदार, कदम वैभव, डोंगरे विलासनी, गवळी मधुकर, हुडे
गोरख, कुंभार दिलीप आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या