30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

एकमत ऑनलाईन

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे. या नव्या (माणिकदंड) रेल्वे मार्गामुळे लातूर रोड ते शिरूर अनंतपाळ, निलंगा, उमरगा मार्गे गुलबर्गा हा मार्गा सोईचा होणार आहे. शिवाय राजकारणासाठी नावलौकिक असलेल्या निलंगा हे गाव नव्या विकासासाठी आता देशपातळीवर झळकणार आहे.

तत्कालीन मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान विकास हवा असेल तर त्यासाठी दळणवळणाची सुविधा असणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवर वजन वापरून त्यांनी सुरुवातीला जहीराबाद-लातूर या राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून घेतला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लातूर रोड ते शिरूर आनंतपाळ (माणिक दंड) मार्गे निलंगा. उमरगा, गुलबर्गा या रेल्वेमार्गाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. शिवाय याबातचे सर्वेक्षण झाले होते. त्यातच तत्कालीन खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांनी ही दक्षिण भाग रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी हा रेंगाळलेला प्रस्ताव लोकसभेमध्ये आवाज उठून ऐरणीवर आला होता.

तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी याबाबत नोंद घेऊन रेल्वे मार्ग मंजुरीबाबत आश्वासन दिले होते. वास्तविक पाहता हा रेल्वेमार्ग यापूर्वीच होणे अपेक्षित होते मात्र हा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळत राहिला त्यातच तत्कालीन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीत निलंगा येथे आलेले रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या समोर जोपर्यंत निलंगा मतदारसंघातून रेल्वे जाणार नाही तोपर्यंत आम्ही सत्कार स्विकारणार नाही असे वचन दिल्याचे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले तेव्हा रेल्वेमंत्री गोयल यांनी लातूरसाठी रेल्वे बोगी कारखाना मागीतला तो दिला. आता मतदारसंघात रेल्वे मागितली तेही देणारच असा शब्द त्यांनी दिला होता. त्याच्या पुर्तीसाठी एक पाऊल पुढे जात गुलबर्गा ते लातूर रोड या दरम्यान १८७ किलोमीटर अंतरावरील रेल्वे ट्रॅक निर्मितीसाठी सर्वेचे काम सुरू झाले आहे.

युवा नेते अरंिवंद पाटील निलंगेकर हा रेल्वे मार्ग दक्षिण भाग जोडण्यासाठी हा सर्वात जुना निजामकालीन सर्वे असून माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी सन २००५ ला रेल्वे मंत्र्याकडे मागणी केली होती. निलंगा व परीसरातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. संभाजीराव पाटील यांनी वारंवार याबाबत पाठपुरावा केला असून सात बाजार समित्या. वैद्यकीय सुविधा, शिक्षण या सर्व बाबींचा विचार करून हा मार्ग महत्त्वाचा आहे. तो आज मार्गी लागत असल्याचा आनंद आहे. शिवाय कोल्हापूर, तुळजापूर व माहूर हे तीन शक्तीपीठ सोयीचे होण्यासाठी दुसरा रेल्वे मार्ग औसा, तुळजापूर मार्गे नवीन रेल्वे मार्ग द्यावा अशी मागणी तत्कालीन मंत्री संभाजीराव पाटील यांनी केंद्रात यापूर्वीच केली आहे.

आमदार ठरत आहेत विकासात अडथळा : जाधव
निलंगा तालुक्यातील ६८ गावे विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आली आहेत. त्यामध्ये कासारसिरशी, मदनसुरी, कासार बालकुंदा यासह परिसराचा विकास करून देश पातळीवरील नकाशावर हा भाग आणू कासारसिरशी तालुका करू म्हणून निवडून आलेले आमदार अभिमन्यू पवार या परिसरातील विकासात अडथळा ठरत असल्याचा आरोप माजी कृषी सभापती बजरंग जाधव यांनी केला आहे. लातूर ते गुलबर्गा निलंगा, मदनसुरी, कासार सिरशी जाणा-या रेल्वेला विरोध करून औसा मार्गे गुलबर्गा रेल्वे जावी म्हणून आग्रह करीत आहेत असा आरोप जाधव यांनी केला आहे.

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या