31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home लातूर कोरोनाची नवी लाट; यंत्रणा ‘जैसे थे’ ठेवा

कोरोनाची नवी लाट; यंत्रणा ‘जैसे थे’ ठेवा

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना साथीच्या नव्या लाटेने दिल्लीचा श्वास गुदमरतोय. नव्या लाटेने दिल्लीस वेढण्यास प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी उभी केलेली यंत्रणा ‘जैसे थे’ ठेवावी. ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगीतले.

बरोबर एका वर्षापुर्वी म्हणजेच दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी जगात कोरोना विषाणु दाखल झाला. आज एका वर्षानंतर कोरोना विषाणुचा विळखा सैल होत असतानाच पुन्हा कोरोनाची नवी लाट येत आहे. देशााची राजधारी दिल्लीत कोरोना साथीच्या नव्या लाटेने धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचा महाराष्ट्रात आणि लातूर जिल्ह्यात काय परिणाम होऊ शकतो. कोरोनाची नवी लाट लातूर जिल्ह्यात येऊ शकते काय? या संदर्भाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख म्हणाले की, दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या विशेषत: लातूर जिल्ह्याच्या वातावरणात खुप फरक आहे. दिल्लीत प्रचंड थंडी आणि त्यात खुप धुकेही आहे. असे वातावरण कोरोना विषाणुची वाढ होण्यास पोषक असते. त्या उलट महाराष्ट्रातील वातावरण आहे. अशा वातावरणात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढले तरी त्याची तिव्रता तितकीसी नसणार. शिवाय कोरोना विषाणुचा संसर्ग कसा रोखायचा, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या, याचा एका वर्षात आरोग्य यंत्रणेला प्रचंड अनुभव आलेला आहे.

कोरोनाच्या साथीच्या नव्या लाटेने दिल्लीला वेढा घातला आहे. त्या पार्श्वभूूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने काही सुचना केल्या आहेत. कार्यरत कोविड सेंटर कमी करु नये, जैसे थे परिस्थिती ठेवा. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात जी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे ती जैसे थे ठेऊन कोरोनाच्या नव्या लाटेबाबत वेट अ‍ॅण्ड वॉच, अशा सुचना दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख म्हणाले. लातूर जिल्ह्यात घरात अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या ९८ हजार ६२० एवढी आहे. १४ दिवस कालावधी पूर्ण झालेल्यांची संख्या ९८ हजार ५३२ आहे. सध्या केवळ ८८ व्यक्ती घरात अलगीकरणात आहेत. २१ हजार ५७३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. १४ दिवसांचा कालावधी २१ हजार ५५० व्यक्तींनी पुर्ण केला आहे. आजघडीला २३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आजपर्यंत ३८ हजार ५७८ आरटीपीसीआर टेस्ट केल्या आहेत. त्यातील ७ हजार २८५ पॉझिटीव्ह केसेस आढळून आल्या आहेत. ७८ हजार ३०६ रॅपीड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्यात त्यात १३ हजार ७१७ केसेस पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. १ लाख १६ हजार ८८४ आरटीपीसीआर व रॅपीड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात एकुण २१ हजार २ केसेसे पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत. २००७३ जण उपराने बरे होऊन घरी गेलेले आहेत. आजपर्यंत लातूर जिल्ह्यात ६३५ जणांचा मृत्यू झालेला आहे. रिक्व्हरी रेट ९५.५७ टक्के एवढा आहे.

जिल्ह्यात ४० टक्केसुद्धा रुग्ण नाहीत
लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी, आरोग्य यंत्रणेने आणि इतर सर्वच यंत्रणेने यशस्वी लढा दिलेला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कोरोना विषाणुच्या संसर्गावर अंकुश ठेवता आले. आजघडीला लातूर शहरात २ आणि औसा, चाकुर, उदगीर व निलंगा येथे प्रत्येकी एक या प्रमाणे ६ कोरोना केअर सेंटर सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे ४० टक्केसुद्धा रुग्ण नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी दिली.

अकलुज पोलिसांवर चोरट्यांचा हल्ला, दोघे जखमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या