31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरदुस-याही दिवशी लातूर शहरात कडकडीत बंद

दुस-याही दिवशी लातूर शहरात कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

पोलिसांकडून वाहनांची कसुन चौकशी

लातूर : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लातूर जिल्ह्यात दि़ १५ ते ३० जुलैदरम्यान लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे़ लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने बुधवारी कडकडीत बंद दिसून आला़ दुसºया दिवशीही बंद कडकडीत राहिला़ दरम्यान पोलीसांनी येणाºया-जाणाºया वाहनांची कसुन चौकशी केली़
लॉकडाऊनच्या दुसºयाही दिवशी शहरातील गरुड चौक, स्वामी विवेकानंद चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक, गंज गोलाई, हनुमान चौक, गांधी चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, एकनंबर चौक, पाचनंबर चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, राजीव गांधी चौक या प्रमुख चौकांतून येणाºया-जाणाºया वाहनांची कसुन चौकशी पोलीसांनी केली़ दवाखान्यासह आवश्यक कारणासाठी जात असल्याचे खात्री पटल्यानंतर पोलीसांनी वाहन पुढे सोडले़ ज्या वाहनातील वाहनचालक व प्रवासांनी येण्या-जाण्याचे योग्य कारण सांगीतले नाही, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यकबाबी सुरु ठेवण्यास परवानगी
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रार्दुभाव व रुग्ण्संख्या विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात दि़ १५ ते ३० जुलैपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार पारित केलेल्या संचारबंदी आदेशामध्ये सुधारणा करुन अपर जिल्हादंडाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी आदेश निर्गमित पुढील अत्यावश्यकबाबी सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील, असे नमूद केले आहे. सर्व आॅनलाईन सेवा पुरविणारे सीएससी नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुरु राहतील.

अत्यावश्यक सेवेतील संस्था (सीएससी, घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्यादी ) यांना दैनिक व्यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्यवहारासाठी बँकेत ये-जा करणेसाठी व व्यवहार करणेसाठी परवानगी असेल. बँकेतील व्यवहारासाठी ये-जा करणा-या व्यक्तीस संस्थेचा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही बाबी बंधनकारक राहतील.

या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता १८६०, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.

Read More  १२ वी निकालासंदर्भातील लातूर जिल्ह्यातील बातम्या

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या