26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ हजारांवर

लातूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ हजारांवर

एकमत ऑनलाईन

२८५ नवे रुग्ण, आणखी ११ बाधितांचा मृत्यू, मृतांचा आकडा ४१३ वर

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी आणखी २८५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४ हजार ०५९ एवढी झाली आहे. त्यातच आणखी ११ बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४१३ वर गेला आहे.

जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. दि. १८ सप्टेंबरपर्यंत सतत चार दिवस दरदिवशी १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर आज त्यातही भर पडत ११ रुग्ण दगावले असल्याने मृतांची संख्या ४१३ वर जाऊन ठेपली आहे. दरम्यान, आज २४२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
काल एकूण ३५० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी १२६ रुग्ण बाधित आढळून आले, तर ७३० रॅपिड अँटिजन चाचण्यांपैकी १५९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्या असे दोन्ही मिळून एकूण २८५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३००६ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, उपचारादरम्यान मृत पावलेल्या ११ रुग्णांमध्ये जिल्ह्यातील आजनसोेंडा (ता. अहमदपूर), टागोरनगर, सद्गुरूनगर लातूर आदी परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.

रुग्ण दुपटीचे प्रमाण ३७.१५ टक्के
जिल्ह्यात रुग्ण दुपटीने वाढ होण्याचे प्रमाण खालावले असून, राज्याच्या तुलनेत ३७.१५ टक्के एवढे आहे., तर राज्यातील प्रमाण ४३.९० वर आहे.

मृत्यूदर २.९ टक्के
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचा दर काहीसा चिंताजनक असून, सद्यस्थितीत २.९ टक्क्यांवर आला असल्याची माहिती आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६८ टक्के
आतापर्यंत १०६४० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७५.६८ टक्के नोंदविल्या गेली आहे.

आलेगाव-मेडशिंगी रोडवररस्ता हद्दीत असणारी विहीर अपघाताला देतेय निमंत्रण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या