30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरजळकोट तालुक्यात बाधितांची संख्या १३० वर

जळकोट तालुक्यात बाधितांची संख्या १३० वर

एकमत ऑनलाईन

जळकोटमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू मृतांची संख्या ६ वर

जळकोट : जळकोट तालुक्यामध्ये कोरोना या महामारीचा प्रसार झपाट्याने होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्ण वाढीचा वेग अधिक वाढला आहे, यामध्ये मृत्युचे प्रमाणही खूप वाढले आहे. विशेष म्हणजे जळकोट शहरात कोरोनामुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जळकोट शहरात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. जळकोट शहरातील एकाचा उदगीर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, संपूर्ण जळकोट तालुक्याचा विचार केला तर आज पर्यंत कोरोना मुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात जळकोट शहरातील चार जणांचा समावेश आहे.

जळकोट तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, १३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यामध्ये आज तारखेला चौरेचाळीस जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत तर ८६ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दि ३० रोजी जळकोट तालुक्यात एकाच दिवशी १४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. जळकोट तालुक्यातील नागरिक कोरोनाबाबत काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे.

जवळपास ५० टक्के नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे, तसेच सोशल डिंस्टसिंगचा अभाव दिसून येत आहे, आठवडी बाजारामध्ये मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळेच मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने कितीही काळजी घेण्याचे आवाहन केले तरी यास नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जळकोट शहरात पुन्हा लॉकडाऊन झाले तर नवल वाटायला नको. अशीच रुग्ण संख्या वाढत गेली तर प्रशासनापुढे जनता कर्फ्यूचा देखील पर्याय उपलब्ध आहे.

सरकारच्या विरोधाला न जुमानता जेईई (मेन्स) परीक्षा आजपासून सुरु

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या