21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरपुलावर खड्डे पडल्यामुळे प्रवास बनला धोकादायक

पुलावर खड्डे पडल्यामुळे प्रवास बनला धोकादायक

एकमत ऑनलाईन

हाळी हंडरगुळी : नांदेड-बिदर महामार्गावरील शिरुर ताजबंदच्या बाहेरुन ते हाळी हंडरगुळी पर्यंत रस्त्यावर एक-दोन फुट खोलीचे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. थातूर मातूर डागडुजी केली. पाऊस पडला त्यामुळे रस्त्याची दैयनीय अवस्था झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सा.बा.विभाग कधी लक्ष देणार अशी चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. वायगाव पाटी जवळ असलेला पुलावर मोठमोठी खड्डे पडले आहेत, पुल कधी ही पडू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहन चालकास धोका संभवत आहे.

नांदेड-बिदर हा राज्य मार्गावर वाहनाची वर्दळ रात्रंदिवस असते. अवजड, दुचाकी, टमटम, जीप, अशा सर्व वाहनाची वर्दळ सतत असते. प्रवाशी व वाहनचालक या रस्त्याला चांगलेच कंटाळले आहेत. कुठला खड्डा कसा चुकवायचा हेच कळत नाही, त्यातच आणखी एक भर गाडी दुरुस्ती देखभाल खर्च वाढला, तर दुचाकी चालवणारे या खड्ड्यात अनेक वेळा पडले आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकी व अन्य वाहने चालविणे अवघड झाले आहे. रात्री अवजड वाहनांमुळे अन्य वाहन चालकांना खड्डा लक्षात येत नाही. पावसामुळे पाणी साठले की खड्डा किती खोल आहे हे कळतच नाह.ी.याचा अंदाज घेता येत नाही. एका ठिकाणी तर पुलावरच मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालकास धोका संभवतो, बहुतांश कामेही तात्पुरत्या स्वरूपाची केली जात आहेत याचे कारण हे स्पष्ट झाले नाही.

वय वाढले की हाडे ठिसूळ होतात खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करणे आता पाठ दुखीला निमंत्रण झाले आहे. जेष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे बनल्याने वाहनाची गती कमी करून वाहन चालवावे लागते आहे. शिरुर ताजबंद ते हंडरगुळी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ लागत आहे. जून महिन्यांपर्यंत काम पूर्णपणे होईल. रस्ता दुरुस्तीसाठी लागणारे काही मटेरियल पण अनेक ठिकाणी टाकले गेले पण मध्येच फक्त मुरुम टाकुन खड्डे बुजवले परत पावसामुळे होत्याचे नव्हते झाले असेच पुढे सुकणी, एकुर्का, गंडीपाटीपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत. संबधीत प्रशासन लक्ष कधी देणार व हा रस्ता कधी बनणार व पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपाची सोय काय होईल यावर चर्चा नागरिकांमधून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या