22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरबाबासाहेबांच्या धम्मदीक्षेची ताकद प्रत्येकाला न्याय देणारी

बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेची ताकद प्रत्येकाला न्याय देणारी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
नामांतराच्या अंदोलनाच्या वेळी कार्यकर्ते गरीब होते, चळवळ श्रीमंत होती. बाबासाहेबांनी देशाला बौध्द धम्माची दीक्षा दिली. जे बौद्ध नाहीत ते दलित आहेत. तेव्हा प्रत्येक भारतीयांनी सन्मानाने जगण्यासाठी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. बाबासाहेबांनी अत्याचारावर स्वार होण्यासाठी धम्म दिला आहे. अत्याचाराशी भिडण्याची ताकत धम्मामध्ये आहे. आपण अन्याय अत्याचाराचा प्रतिकार केला पाहिजे, ही बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मदिक्षेची ताकद आहे. ती प्रत्येक माणसाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी बचत गट, लातूर यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ‘धम्मक्रांती दिशा आणि दशा’ या विषयावर ११ वे पुष्प गुंफताना प्रा. जोगेंद्र कवाडे शहरातील भालचंद्र ब्लड बँक येथे बोलत होते. प्रबोधन मंचावर पूजनीय भिक्खू पय्यानंद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘चलो बुद्ध की और’ या अभियानाचे डी. एस. नरसिंगे होते. पुढे बोलताना प्रा. कवाडे यांनी बाबासाहेबांचे तत्वज्ञान आपण पेरायला शिकले पाहिजे, धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाज पुढे गेला पाहिजे, धम्म लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शिकलेल्या समाजाची खूप मोठी जबाबदारी आहे. अत्याचार करायला आलेल्याशी दोन हात करायला शिका. भेकड माणसाला जगण्याचा अधिकार नसतो, मृत्यूला आव्हान देण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली. ती दिशा स्पष्ट आहे. तेव्हा बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माची दशा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.

प्रारंभी बचत गटाचे सचिव डॉ. मा. ना. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. दुष्यंत कटारे तर अध्यक्ष के. डी. कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील मोहन माने, केशव कांबळे, एन.डी. सोनकांबळे, हर्षवर्धन कोल्हापुरे, देवदत्त सावंत, बालाजी कांबळे, यु. डी. गायकवाड व्ही. एस. पँथरचे विनोद खटके, भिम आर्मीचे जवान उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल जाधव, शिवाजी तुरेवाले, एस. के. कांबळे, पी. एन. कांबळे, अशोक नेत्रगावकर, जगदीश कोकाटे, सुरेश बडोले, सुधाकर कांबळे, गौतम कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला लातूर आणि परिसरातील वैचारिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या