27.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नये, जनतेला सोयीसुविधा पुरवा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नये, जनतेला सोयीसुविधा पुरवा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील बाबानगर, खाडगाव रोड कंटेन्मेंट झोन परिसरास शनिवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली. या कंटेन्मेंट झोनमध्ये कोवीड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये या करीता सर्व प्रकारची काळजी घ्यावी, जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी या वेळी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शनिवारी, दि. १३ जून रोजी दुपारी बाबानगर, खाडगाव रोड कंटेन्मेंट झोन परिसराला भेट दिली. येथील नागरिकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला़ काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगून दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तेथे उपस्थित अधिकाºयांसह सर्वांना या ठिकाणी कंटेन्मेंट झोनच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे निर्देश दिले आहेत. बाबानगर, खाडगाव रोड कंटेन्मेंट झोन परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यांना जीवनावश्यक लागणारे साहित्य मिळण्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना मनपा प्रशासनास त्यांनी दिल्या आहेत.

या वेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक आयुब मनियार, पप्पू देशमुख, नागसेन कामेगावकर, आयुक्त देविदास टेकाळे,  उपायुक्त हर्षल गायकवाड, उपआयुक्त सुंदर बोंदर, डॉ. प्रशात माले, डॉ. रवी पुरी, पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, उपअभियंता एस. एन. काझी, दत्ता सोमवंशी, सचिन गंगावणे, डॉ. एस. बी. कदम, प्रशांत महाले, एम. बी. फिस्के आदी उपस्थित होते.

आर्सेनिक अल्ब-३० गोळ्यांचे वाटप
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर शहरातील कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना आर्सेनिक अल्ब ३० गोळ्यांच्या वाटपास प्रारंभ करण्यात आला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी उपाययोजना करीत आहेत. आजतागायत कोरोना विषाणूवर लस उपलब्ध झालेली नाही; परंतु आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी आर्सेनिक अल्ब- ३० या होमिओपॅथिक गोळ्यांमुळे मानवी शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढत असल्याचे प्रमाणित केले आहे. नुकतीच महाराष्ट्र शासनानेही अशा गोळ्यांच्या वापरास मान्यता दिलेली आहे. लातूरचे ख्यातनाम होमिओपॅथिक वैद्यकीय तज्ज्ञ डॉ़ रविराज पोरे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आर्सेनिक अल्ब-३० गोळ्या लातूर शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र म्हणजेच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना घरोघरी वाटप करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढून कोरोना विषाणूची लागण होण्यापासून काही अंशी बचाव होण्यास मदत होणार आहे.

Read More  सरकारची चिंता वाढली :कोरोनाच्या लक्षणात आणखी दोन नव्या लक्षणांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या