19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरगंगापूर पाझर तलावाच्या सांडव्यातून पाणी सोडून दिल्याने संभाव्य धोका टळला

गंगापूर पाझर तलावाच्या सांडव्यातून पाणी सोडून दिल्याने संभाव्य धोका टळला

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर तालुक्यातील गंगापूर शिवारात पाझर तलावास धोका निर्माण झाल्याची माहिती समाजमाध्यमाद्वारे मिळताच राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जलसंपदा विभागास सतर्क केले. सदरील विभागने परिस्थितीचे गाभिर्य लक्षात घेऊन या तलावाच्या सांडव्याद्वारे पाणी काढून दिल्याने संभाव्य धोका आणि नुकसान टळले आहे.

सोमवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी समाज माध्यमातून पालकमंत्री देशमुख यांना गंगापूर पाझर तलावास धोका निर्माण झाल्याची माहिती गावक-यांमार्फत मिळाली. त्यांनी या माहितीची तात्काळ दखल घेऊन जलसंपदा विभागाला सतर्क केले. त्यानुसार जलसंपदा विभागाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाझर तलावाची पहाणी केली, तलावाची पाळू खचली असून यातून धोका निर्माण होवु शकतो ही बाब लक्षात आल्याने सांडव्याद्वारे पाणी काढून देण्याचा निर्णय घेतला तशी कार्यवाही केली.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, ट्वेंटीवन शुगर्स लि. चे व्हाईस चेअरमन व लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपविभागीय अभियंता श्याम वाघमारे, शाखाधिकारी अशोक अंजनीकर, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, महेश काळे, गंगापूरचे सरपंच बाबू खंदाडे, उपसरपंच शेख रफिक मुस्तफा, डॉ. कानडे, शेख सादिक, शेतकरी महेश गोरे आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी गंगापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या