22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरदहावीचा ३७.६९ टक्के तर बारावीचा ३६.४९ टक्के निकाल

दहावीचा ३७.६९ टक्के तर बारावीचा ३६.४९ टक्के निकाल

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या परीक्षेचा लातूर विभागीय मंडळाचा १० वीचा निकाल ३७.६९ टक्के तर १२ वीचा निकाल ३६.४९ टक्के लागला आहे.

लातूर, उस्मानाबाद व नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर विभागीय मंडाळातून दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ११८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९८७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील ३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावी पुरवणी परीक्षेचा लातूर विभागीय मंडळाचा निकाल ३७.६९ टक्के लागला आहे.

लातूर विभागीय मंडाळातून बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावी पुरवणी परीक्षेचा लातूर विभागीय मंडळाचा निकाल ३६.४९ टक्के लागला आहे. बारावीच्याच जुन्या अभ्यासक्रमाचा लातूर विभागीय मंडळाचा निकाल ४७.१० टक्के लागला आहे. जुन्या अभ्यासक्रमाला लातूर विभागीय मंडळातून ७५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७२६ विद्यार्थ्यी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या