22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरनगर पंचायत ते बसवेश्वर चौक रस्ता चिखलय

नगर पंचायत ते बसवेश्वर चौक रस्ता चिखलय

एकमत ऑनलाईन

रेणापूर :रेणापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील तसेच छत्रपती संभाजी नगर भागातून जाणा-या नगर पंचायत कार्यालय ते बस्वेश्वर चौकात जाणा-या रस्त्याची दैनिय अवस्था झाली असून ठिकठिकाणी रस्त्यावर चिखलाचे डेरे झाले आहेत. रस्त्यावर मुरूम टाकुन डागडुजी करावी या मागणीसाठी रेणापूर शहर विलासराव देशमुख युवा मंचा च्या वतीने १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालय अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन मंचाचे शहराध्यक्ष सचिन इगे तहसीलदार तथा नगरपंचायतीचे प्रशासक , मुख्याधिकारी यांना दिले आहे .

नगरपंचायत ते महात्माबस्वेश्वर चौकापर्यत संभाजी नगर भागातून जाणारा हा रस्ता गावात जाणारा जवळा मुख्य रस्ता मानला जातो . सदर रस्ता हा बसस्थानकच्या पाठीमागुन व मुख्य रस्त्यापासुन जवळ असल्याने या रस्त्यावर गावात जाण्यासाठी नागरिकांची विशेषता महिलांची वर्दळ असते पावसाळ्यात हा रस्त्याच गायब होऊन ठिकठिकाणी चिखलाचे डेरे तयार होऊन रस्त्यात खड्डा की, खड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण होते. या रस्त्यावर वाहन तर सोडाच नागरिकांनाही चालणे जिकरिचे झाले आहे .

यावर्षी कांही प्रमाणात मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आल्याने दिलासा मिळाला होता . त्यातच हा रस्ता खोदून नवीन पाईपलाईन करण्यात आली. खोदलेली काळी माती रस्त्यावर पडल्याने रस्ता आणखीणच चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरच उर्दू माध्यामाची शाळा, जिल्हा परिषदेची केन्द्रीय शाळा असून या रस्त्यामुळे शाळेत येणा-या विद्यार्थ्याना मोठी कसरत करावी लागते. याबरोबर काही वयोवृध्द महिला व पुरूषांना चिखलमय रस्त्यावर चालताना पाय घसरून दुखापत ही झाली आहे, काही दिवसावर नवरात्र महोत्सव सुरू होणार आहे त्यासाठी तर बाहेरगावाहून भक्तगण हे श्री.रेणुकादेवी मंदिर तसेच रानातील तुकाई मंदिरकडे दर्शनासाठी नऊ दिवस याच रस्त्यावरून ये जा करीत असतात अशा वेळी त्यांना या चिखलमय रस्त्याचा अडथळा येऊ शकत.ो.

तेव्हा छत्रपती संभाजी चौक ते बसवेश्वर चौक, चांदणी चौक, पोलिस ठाण्या शेजारी रस्ता, शिवाजी (पद्दम)पाटील यांच्या शेत रस्ता तसेच, बसवेश्वर चौक ते (विठ्ठल कटके यांच्या घरापासून) तुकाई मंदिरकडे जाणारा रस्ता या व राहीलेले चिखलमय वस्तीत ठिकाणी मुरूम टाकणे गरजेचे आहे. याबाबत नगरपंचायतच मुख्यधिकारी यांना निवेदन दिली केवळ आश्वासने देण्यात आली असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत कार्यावाही कारावी अन्यथा रेणापूर शहर विलासराव देशमुख युवा मंचा च्या वतीने १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालय अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन मंचाचे शहराध्यक्ष सचिन इगे तहसीलदार तथा नगरपंचायतीचे प्रशासक , मुख्याधिकारी यांना दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या