16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeलातूरआनंदवाडी येथील रस्त्याची प्रचंड दूरवस्था

आनंदवाडी येथील रस्त्याची प्रचंड दूरवस्था

एकमत ऑनलाईन

शिवणी कोतल : निलंगा तालुक्यातील शिवणी कोतलपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याच्या प्रचंड दूरवस्थेमुळे गैरसोय होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना अधिक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पाचशे ते सहाशे लोकसंख्या असलेल्या या गावात आजपर्यंत विकासाची गंगा गावापर्यंत आजपर्यंत पोहचलीच नाही. आजही या गावातील मुलांना शाळेसाठी तर येथील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधासाठी दोन किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे.गावात जाण्यासाठी चागला रस्ता नाही.ओढ्यावर पूल नसल्यामुळे मोठा पाऊस पडल्यानंतर दुस-या गावांचा गावांचा संपर्क तुटतो. गावाबाहेर गेलेल्यांना गावात परत जाता येते नाही. पाऊस पडल्यानंतर विद्यार्थाना तर शाळेला सुट्टीच घ्यावी लागते. गावात रात्रीच्या सुमारास आरोग्यासंबधीत समस्या झाली तर रुग्णास दोन किलोमीटर पायी चालत यावे लागत आहे.आनंदवाडी ते शिवणी गावाला जोडण्यासाठी दोन पुलाचा वापर करावा लागतो. एका ठिकाणी छोटा तर एका ठिकाणी पूलच नाही. मग महिलांनी व विदयार्थी या पाण्यातून जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

येणा-या काळात गावाला सुविधा उपलब्ध करुन न दिल्यास एकाही लोकप्रतिनिधीस गावात फिरू देणार नाही, असा इशारा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी दिनकर साळुंखे, महादेव शिंदे, श्रीनिवास शिंदे, नंदकुमार शेळके, पाडुरंग शिंदे,बालाजी खाडगावे,बंडू चिलबीले, शिवानंद चिलबीले, विलास भोसले, राजेंद्र भोसले,रमेश चिलबीले, राहुल खाडगावे,वष्णिू भोसले, राम भोसले,भागवत खाडगावे,अमोल पाटील, धनाजी जोगदंड, प्रकाश धप्पाधुळे,शरणाप्पा धप्पाधुळे, नरंिसंग सुतार, शिधाजी साळुंके,गोपीकीशन शिंदे,संतोष धुमाळ उपस्थित होते. राजकारणी निवडणूक आली की आश्वासन देऊन जातात. नंतर आमच्या कडे कोणीही फिरकत असे रघुनाथ सुगावे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या