28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन शॉर्ट फिल्म ‘पिझ्झा हार्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

शॉर्ट फिल्म ‘पिझ्झा हार्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरचे सुपुत्र तथा चित्रपट सृष्टीत अल्पावधीत आपल्या कठोर परिश्रमाने स्वत:ची ओळख निर्माण करणा-या विशाल गिरी दिग्दर्शित सामाजिक आशय असलेली ‘पिझ्झा हार्ट’ ही शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिग्दर्शक विशाल गिरी यांनी आजच्या वास्तवतेला तेवढ्याच तन्मयतेने पडद्यावर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

विशाल गिरी या तरुणाने आतापर्यंत एक हसिन धोखा, हिरो २०२०, सुसाईड, मैं कौन हूँ सारख्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अतिशय चांगल्या शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत. सामाजिक आशय असलेली त्यांची नवीन शॉर्ट फिल्म ‘पिझ्झा हार्ट’ ही लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पिझ्झा हार्ट’ या शॉर्ट फिल्मबद्दल बोलताना विशाल गिरी यांनी सांगितले की, ही कथा सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडणारी आहे.

एक गरीब आई आपल्या मुलाला पिझ्झाची चव चाखायला मिळावी यासाठी काय करते, त्यासाठी तिला कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागतो. व्यसनी पिता कोणत्या कारणामुळे स्वत:त सुधारणा करुन घ्यायला प्रवृत्त होतो, यासारख्या दृश्यांनी ही शॉर्ट फिल्म निश्चितच प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेईल, असा विश्वास विशाल गिरी यांनी व्यक्त केला आहे. ही फिल्म फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण संवर्धनासाठी सांगोल्यात वृक्ष बँकेची स्थापना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या