24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूररेणा मध्यम प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले

रेणा मध्यम प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले

एकमत ऑनलाईन

रेणापुर : तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने मंगळवार दि. २८ रोजी पहाटे ४ वा. प्रकल्पाचे सहा दरवाजे ५० सें.मी उघडून पाण्याचा रेणा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे रेणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

रेणापुर तालुक्यात सोमवार दि .२७ रोजी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने महिन्यात तिसऱ्यादा रेणा मध्यम प्रकल्पाची दारे उघडण्याची वेळ आहे. रेणा प्रकल्प झाल्यापासुन पहिल्यादाच महिन्यांत तिनदा दार घडण्याची वेळ आहे. प्रकल्पातील पाण्याचा ओघ पाहून सहाही दरवाजे ५० से.मी. ने उघडण्यात येवुन त्या पाण्याचा रेणा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापुर, खरोळा येथील तिन्ही बॅरेजेसचे दारे काढण्यात आली आहे. ५० से.मी. ने उघडून २६१ .९० क्युमेक्स व ९२४७ क्युसेक्स प्रकल्पातील पाण्याचा रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. माहिती उपविभागीय अभियंता विजय हिबारे, प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी ,राजकुमार तिमलदार शाखाधिकारी वैभव जाधव यांच्यासह अदि ची उपस्थिती आहे.

रेणा नदी दुथडी भरून वाहत असुन नदी काठच्या शेतकऱ्यांना सतर्ततेचा इशारा तहसिल व पोलीस प्रशासनाने दिल्याने नदी काठच्या शेतकऱ्यांना शेतातील जनावरे घरी आणली आहेत. रेणा नदीच्या जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरीकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या