लातूर : प्रतिनिधी
आईला वडीलांनी मारहाण केल्याचा राग मनात धरून २३ वर्षीय मुलाने घरात ठेवलेला चाकू काढुन वडीलांच्या पोटात उजवे बाजुस तसेच छातीचे मध्यभागी चाकु मारून जिवानीशी ठार मारल्याची घटना रेणुका नगर, आंबा हनुमान मंदीरच्या पाठीमागे, लातूर येथे दि. ३ जून रोजी रात्री ९.२१ वाजता घडली.
मोलमजूरी करून सोमनाथ मधुकर क्षिरसागर वय ४८ रा. दिनु जाणकर यांचे घरी भाडयाने, रेणुका नगर आंबा हनुमान मंदीरचे पाठीमागे, लातूर येथे राहत होते. सतत मद्य प्राशन करून घरी येत व आईला मारहाण करत होते. दि. ३ जून रोजी आईला (सोमनाथ मधुकर क्षिरसागर) वडीलांनी मारहाण केल्याचा राग मनात धरून २३ वर्षीय रोहीत सोमनाथ क्षिरसागर याने रात्री ९.२१ वाजता घरात ठेवलेला चाकू काढुन वडीलांच्या पोटात उजवे बाजुस, तसेच छातीचे मध्यभागी चाकु मारून जिवानीशी ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी रोहीत सोमनाथ क्षिरसागर यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी मंगल सोमनाथ क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहीत सोमनाथ क्षिरसागर याच्या विरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहेत.