24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरसंकटात सापडलेल्या शेतक-यांना राज्य सरकारने भरीव मदत द्यावी

संकटात सापडलेल्या शेतक-यांना राज्य सरकारने भरीव मदत द्यावी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे लातूर ग्रामीणमधील अनेक गावांतील शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आता राज्य सरकारने भरीव मदत करुन दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मंगळवारी येथे केली.

लातूर तालुक्यातील बामणी आणि आजूबाजूच्या नुकसानग्रस्त गावांना आमदार धिरज देशमुख यांनी भेट देऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा मांडत ‘सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करावा’, अशी मागणी केली. या मागणीची सरकारने त्वरित दखल घ्यावी आणि आपल्याला आर्थिक मदत करावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे आमदार धिरज देशमुख यांनी शेतकरी बांधवांना सांगितले. एकीकडे गोगलगायींचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे सततचा पाऊस यामुळे शेतकरी बांधव त्रासून गेला आहे. पावसामुळे अनेकांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. पिके, भाज्या भुईसपाट झाले आहेत. कुजले आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी बांधवांना सरसकट मदत देणे आवश्यक आहे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, मंडळ अधिकारी गवळी, कृषी अधिकारी सतीश कोरे, कृषी सहाय्यक विशाल झांबरे, तलाठी वाडवरकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय हट्टे, सचिन बंडापल्ले, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रघुनाथ शिंदे, भातांगळीचे सरपंच परमेश्वर पाटील, बामणीचे सरपंच वैजनाथ दिवटे, उपसरपंच संजय
ठाकूर, लातूर तालुका ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानोबा गवळे, आत्माराम माडे, विपीन गवरे, नारायण पाटील, प्रवीण मुचाटे, राजकुमार करपे, राजकुमार बोळंगे, लक्ष्मण गोकुळे, प्रवीण मुचाटे, कमलाकर बनसोडे, मारोती शिंदे, पवन बोजे, अरुण वीर, बाळू चिंते, पंढरीनाथ गवरे, रहीम मुजावर, जनार्दन गवरे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या